Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global Health: कोरोनाव्हायरस नंतर ‘या’ भयानक व्हायरसने काढले डोके वर; 68 कोटी लोकांना संसर्ग, 2 लाख मृत्यू अन् जागतिक भीषण वास्तव

Norovirus : चीनमध्ये आता नोरोव्हायरसमुळे दहशत पसरत आहे. चिनी शाळेतील १०० हून अधिक विद्यार्थ्यांना याची लागण झाली आहे. या विषाणूमुळे पोटात संसर्ग होतो, ज्यामुळे उलट्या आणि जुलाब होतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 17, 2026 | 01:04 PM
china norovirus outbreak foshan school students infected symptoms 2026

china norovirus outbreak foshan school students infected symptoms 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • चीनमध्ये नोरोव्हायरसचा थरार
  • विषाणूचा वेगवान प्रसार
  • जागतिक आरोग्य संकट

Norovirus outbreak China January 2026 : जगाला ‘कोविड-१९’ (COVID-19) च्या संकटात ढकलणाऱ्या चीनमधून आता पुन्हा एकदा एका नवीन आरोग्य संकटाची बातमी समोर येत आहे. चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील फोशान शहरात एका हायस्कूलमधील तब्बल १०३ विद्यार्थ्यांना नोरोव्हायरस (Norovirus) या अत्यंत संसर्गजन्य विषाणूची लागण झाली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आजारी पडल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, फोशानमधील ‘झिंगहुई माध्यमिक शाळेत’ ही घटना घडली. अचानक अनेक विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागल्याने आरोग्य विभागाला पाचारण करण्यात आले. तपासणीअंती १०३ विद्यार्थ्यांना नोरोव्हायरसचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. सुदैवाने, स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून कोणाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र, या घटनेने चीनमधील शाळांच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Defense Deals: ‘आम्ही शस्त्रेही देऊ आणि तंत्रज्ञानही!’ जर्मनीच्या पंतप्रधानांनी भारताला दिली जागतिक बाजारपेठ हादरवणारी महाऑफर

काय आहे हा नोरोव्हायरस?

नोरोव्हायरस हा विषाणूंचा एक असा गट आहे, जो थेट पचनसंस्थेवर (पोट आणि आतड्यांवर) हल्ला करतो. याला सामान्यतः ‘विंटर व्होमिटिंग बग’ (Winter Vomiting Bug) किंवा ‘पोटाचा फ्लू’ म्हणूनही ओळखले जाते. जरी हा विषाणू कोविडसारखा श्वसनविकार नसला, तरी त्याचा प्रसार होण्याचा वेग थक्क करणारा आहे. अवघ्या काही तासांत हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो.

#MedTwitter
There is a widespread outbreak of #norovirus, a GI virus that causes projectile vomiting & profuse diarrhea usually lasting 24-48 hrs. Wastewater levels nationwide are high. It’s miserable & incredibly contagious. So many friends are texting us SOS, so here’s a 🧵. /1 pic.twitter.com/GyO4Ki9a5B
— Tatiana Prowell, MD (@tmprowell) January 4, 2025

credit – social media and Twitter

कसा पसरतो हा विषाणू?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नोरोव्हायरस खालील मार्गांनी पसरतो: १. दूषित अन्न आणि पाणी: जर अन्न तयार करणारी व्यक्ती संक्रमित असेल, तर त्या अन्नातून विषाणू पसरू शकतो. २. संपर्क: संक्रमित व्यक्तीच्या जवळ जाणे किंवा त्यांच्याशी वस्तू सामायिक करणे. ३. दूषित पृष्ठभाग: दरवाजाचे हँडल, बाके किंवा टॉयलेट फ्लश यांसारख्या वस्तूंना स्पर्श केल्यानंतर हात तोंडाला लावल्यास संसर्ग होतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ChinaTaiwan: ड्रॅगनचा तैवानला विळखा! दारात युद्धछाया; 34 लढाऊ विमाने, 11 नौदल जहाजांनी मध्यरेषा ओलांडली, भारताचीही बारीक नजर

जागतिक आकडेवारी आणि भीती

नोरोव्हायरसचे संकट केवळ चीनपुरते मर्यादित नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, दरवर्षी जगात ६८ कोटी ५० लाख लोकांना याची लागण होते. धक्कादायक म्हणजे, दरवर्षी सुमारे २ लाख लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू होतो, ज्यामध्ये ५०,००० ही केवळ लहान मुले असतात. गरीब आणि विकसनशील देशांमध्ये स्वच्छतेच्या अभावामुळे हा विषाणू अधिक जीवघेणा ठरतो.

इतिहास आणि नाव: ‘नॉरवॉक’ ते ‘नोरो’

या विषाणूचा पहिला मोठा प्रादुर्भाव १९६८ मध्ये अमेरिकेच्या ओहायो राज्यातील नॉरवॉक (Norwalk) येथील एका शाळेत दिसून आला होता. सुरुवातीला याला ‘नॉरवॉक व्हायरस’ म्हटले जायचे, परंतु पुढे संशोधनानंतर त्याचे नाव बदलून ‘नोरोव्हायरस’ करण्यात आले.

बचावाचे उपाय: तुम्ही स्वतःला कसे सुरक्षित ठेवू शकता?

नोरोव्हायरसवर सध्या कोणतीही खात्रीशीर लस उपलब्ध नाही, त्यामुळे प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार आहे:

  • हात धुणे: जेवणापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा. (सॅनिटायझर या विषाणूवर फारसा प्रभावी नसतो).
  • भाज्या आणि फळे: फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी पूर्णपणे स्वच्छ धुवा.
  • स्वच्छता: घर आणि आजूबाजूचा परिसर जंतुनाशकाने स्वच्छ ठेवा.
  • विश्रांती: संसर्ग झाल्यास भरपूर पाणी प्या आणि स्वतःला इतरांपासून वेगळे (Isolate) ठेवा.
💡

Frequently Asked Questions

  • Que: नोरोव्हायरस आणि सामान्य फ्लूमधील फरक काय आहे?

    Ans: सामान्य फ्लू हा श्वसनसंस्थेवर परिणाम करतो, तर नोरोव्हायरस पचनसंस्थेवर हल्ला करतो, ज्यामुळे उलट्या आणि जुलाब होतात.

  • Que: हा विषाणू किती वेळ शरीरात राहतो?

    Ans: याची लक्षणे सहसा १ ते ३ दिवस टिकतात, मात्र रुग्ण बरा झाल्यानंतरही २-३ दिवस संसर्ग पसरवू शकतो.

  • Que: सॅनिटायझरने नोरोव्हायरस मरतो का?

    Ans: नाही, अनेक अभ्यासांनुसार अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर नोरोव्हायरसवर प्रभावी नसतात; हात धुण्यासाठी साबण आणि पाणी वापरणेच सुरक्षित आहे.

Web Title: China norovirus outbreak foshan school students infected symptoms 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • China
  • Health News
  • international news
  • virus

संबंधित बातम्या

UK Parliament: ब्रिटिश हिंदू रस्त्यावर! लंडनमध्ये ‘हनुमान चालीसा’ पठण करत बांगलादेश सरकारचा निषेध, ब्रिटन संसदही संतप्त
1

UK Parliament: ब्रिटिश हिंदू रस्त्यावर! लंडनमध्ये ‘हनुमान चालीसा’ पठण करत बांगलादेश सरकारचा निषेध, ब्रिटन संसदही संतप्त

Bangladesh Attacks On Hindu: धार्मिक कट्टरतेचा बळी! सिल्हेटमध्ये प्रतिष्ठित हिंदू शिक्षकाच्या घराची राखरांगोळी, पाहा VIRAL VIDEO
2

Bangladesh Attacks On Hindu: धार्मिक कट्टरतेचा बळी! सिल्हेटमध्ये प्रतिष्ठित हिंदू शिक्षकाच्या घराची राखरांगोळी, पाहा VIRAL VIDEO

New World Order: ‘चीन, भारत, रशिया आणि युरोप…’ जन्म घेतेय एक नवीन जागतिक व्यवस्था; पण कॅनडा होणार का नेता?
3

New World Order: ‘चीन, भारत, रशिया आणि युरोप…’ जन्म घेतेय एक नवीन जागतिक व्यवस्था; पण कॅनडा होणार का नेता?

ChinaTaiwan: ड्रॅगनचा तैवानला विळखा! दारात युद्धछाया; 34 लढाऊ विमाने, 11 नौदल जहाजांनी मध्यरेषा ओलांडली, भारताचीही बारीक नजर
4

ChinaTaiwan: ड्रॅगनचा तैवानला विळखा! दारात युद्धछाया; 34 लढाऊ विमाने, 11 नौदल जहाजांनी मध्यरेषा ओलांडली, भारताचीही बारीक नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.