जर्मनी कधीही भारताला सबमशीनगन देत नव्हता, आता तो ८ अब्ज डॉलर्सच्या किलर पाणबुड्या देणार आहे, तो पुढचा रशिया बनेल का? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Project 75I German Type 214 NG AIP submarine : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि जर्मन चांसलर फ्रेडरिक मेर्झ यांच्या भेटीनंतर भारत आणि जर्मनीमधील (Germany) संबंधांनी एक ऐतिहासिक वळण घेतले आहे. गेल्या २५ वर्षांतील सर्वात मोठ्या संरक्षण कराराकडे या दोन्ही देशांची पावले पडत आहेत. भारताने आपल्या ‘प्रोजेक्ट ७५-आय’ (Project 75I) अंतर्गत जर्मनीकडून ६ अत्याधुनिक पाणबुड्या खरेदी करण्याचा निर्णय जवळजवळ अंतिम केला आहे. या एका कराराने जागतिक संरक्षण बाजारपेठेत जर्मनीचा दबदबा वाढला असून, भारत आता रशियावरील आपले अवलंबित्व कमी करून जर्मनीकडे एक ‘भक्कम पर्याय’ म्हणून पाहत आहे.
एक काळ असा होता जेव्हा जर्मनीच्या माजी चांसलर अँजेला मर्केल यांच्या सरकारने भारताला साधी ‘एमपी५’ (MP5) सबमशीन गन देण्यासही नकार दिला होता. मानवी हक्कांचे कारण देत जर्मनीने भारतावर शस्त्रबंदी लादली होती. मात्र, चांसलर फ्रेडरिक मेर्झ यांनी हा अडथळा पार करत भारताला आपला सर्वात विश्वासार्ह मित्र मानले आहे. मेर्झ यांनी स्पष्ट केले आहे की, जर्मनी आता केवळ शस्त्रे विकणार नाही, तर भारताला तंत्रज्ञान हस्तांतरित (Technology Transfer) करून ‘मेक इन इंडिया’ला गती देईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Poseidon Drone: पुतिनकडे आहे पाण्याखालील प्रलयकाळाचा अग्रदूत; जो कुठेही आणू शकतो 500 फूट उंचीची त्सुनामी, वाचा खासियत
जर्मनीकडून मिळणाऱ्या या पाणबुड्या एआयपी (AIP – Air Independent Propulsion) तंत्रज्ञानाने सज्ज असतील.
–#India & #Germany to finalize largest military contract to date
-The $8 Bn 6 P75(I) submarine joint production deal is likely to be concluded during the upcoming visit of German Chancellor Friedrich Merz to India on 12 & 13 Jan pic.twitter.com/4YYsUqam9q — Insightful Geopolitics (@InsightGL) January 8, 2026
credit – social media and Twitter
दशकानुदशके भारत आपल्या शस्त्रास्त्रांसाठी रशियावर अवलंबून आहे. मात्र, युक्रेन युद्धामुळे रशियाकडून मिळणाऱ्या सुट्या भागांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. अशा वेळी जर्मनीने भारताला दिलेली ८ अब्ज डॉलर्सची ही ऑफर भारतासाठी एक मोठा आधार ठरली आहे. लष्करी विश्लेषकांच्या मते, जर हा करार यशस्वी झाला, तर जर्मनी हा भारताचा ‘पुढचा रशिया’ म्हणजेच सर्वात मोठा संरक्षण भागीदार ठरू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran US Conflict: ‘थांबा, नका करू हल्ला!’ इराणवरील अमेरिकन हल्ला रोखण्यासाठी रात्रभर या देशांमध्ये चाललं ‘राजनैतिक युद्ध’
पाकिस्तानने अलीकडेच चीनकडून ८ ‘हँगोर’ क्लास (Hangor-class) पाणबुड्या घेतल्या आहेत. चीननेही हिंदी महासागरात आपली उपस्थिती वाढवली आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताला प्रगत पाणबुड्यांची गरज होती. माझगाव डॉक (MDL) आणि जर्मनीची थिसनक्रुप या करारामुळे भारताची समुद्रातील शक्ती कित्येक पटीने वाढणार आहे.
Ans: भारत आणि जर्मनीमध्ये ६ प्रगत एआयपी पाणबुड्यांच्या खरेदीसाठी सुमारे ८ अब्ज डॉलर्सचा करार अंतिम टप्प्यात आहे.
Ans: तत्कालीन जर्मन सरकारने भारताचा मानवी हक्कांचा रेकॉर्ड खराब असल्याचे सांगून लहान शस्त्रांच्या पुरवठ्यावर बंदी घातली होती.
Ans: एआयपी तंत्रज्ञानामुळे डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांना बॅटरी चार्ज करण्यासाठी वारंवार समुद्राच्या पृष्ठभागावर यावे लागत नाही, ज्यामुळे त्या शत्रूच्या नजरेतून वाचतात.






