
chinese military aircraft locks its radar on japan's fighter jets
जपानच्या हवाई संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, ओकिनावाच्या समुद्री भागात चीनने जपानच्या लढाऊ विमानांवर रडार लॉक केले आहे. जपानने चीनच्या या कृतीला चिथावणीखोर संबोधले आहे. तसेच चीनच्या या कृत्याचा निषेध नोंदवत गंभीर इशाराही दिला आहे. जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या लियाओनिंग या विमानवाहू जहाजावरुन उड्डाण करत असलेल्या जपानच्या J-15 आणि F-15 या लढाऊ विमानांना लक्ष्य करण्यात आले आहे. दोन्ही विमानांना जवळपास तीस मिनिटे रडार लॉक करण्यात आले होते. जपानने ड्रॅगच्या या कृतीला युद्धाची चिथावणी म्हटले आहे.
यामुळे जपानने संतप्त होत चीनच्या या कृतीचा तीव्र निषेध केला आहे. तसेच जपानने चीनला ही धोकादायक खेळी त्यांच्या हवाई क्षेत्राचे उलल्ंघन मानले जाईल असा इशारा दिला आहे. तसेच अशा प्रकारे रडार लॉक करणे हे उड्डाण सुरक्षेच्या नियामंविरुद्ध आहे. यामुळे कोणत्याही क्षणी वैमानिकांमध्ये संघर्ष होऊ शकतो असे जपानने म्हटले आहे. जपानने चीनला त्यांच्या हवाई क्षेत्रापासून दूर राहण्याचा गंभीर इशारा दिला आहे. जपानच्या संरक्षण मंत्री शिंजिरो कोइजुमी यांनी या कुरघोडीली अत्यंत निंदनीय आणि धोकादायक म्हटले आहे.
रडार लॉक म्हणजे एखाद्या देशाच्या लढाऊ विमानाने दुसऱ्या देशाच्या लढाऊ विमानाला आपल्या रडार प्रणालीवर ठेवणे. यामुळे शत्रू देशाच्या स्थिती, गती आणि दिशेनवर बारकाईने आणि अचूकणे नजर ठेवता येते. ही कृती युद्धाची चिथावणी संबोधली जाते. कारण अनेकदा युद्धजन्य परिस्थितीत शत्रू देशावर नजर ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो.
गेल्या काही महिन्यांमध्ये चीनच्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रामध्ये जपानविरोधी कुरघोड्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. चीनच्या या कृतीमुळे जपानने युद्धाचा अभ्यास तीव्र केला आहे. तसेच चीन देखील जपानवर तीव्र हल्ल्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
Ans: चीनने जपानच्या ओकिनावा बेटाजवळी हवाई क्षेत्रामध्ये त्यांच्या लढाऊ विमानांना रडार लॉक केले आहे.
Ans: चीनने जपानच्या लढाऊ विमानांना दोन वेळा रडार लॉक केले आहे. पहिल्यांदा 3 मिनिटांचा तर नंतर तीस मिनिटांचा रडार लॉक करण्यात आला आहे.
Ans: जपानने चीनच्या रडार लॉकचा तीव्र निषेध नोंदवला असून ही कृती उड्डाण सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारी आणि युद्धाची चिथावणी असल्याचे म्हटले आहे.