Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनी विमाने तैवानच्या हवाई हद्दीत; सलग तिसऱ्या दिवशीही घुसखोरी, अमेरिकेच्या हालचालींवर चीनची नजर

चीनने पुन्हा एकदा तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलग तिसऱ्या दिवशी चिनी लष्करी हालचालींनी तैवानची सुरक्षा चिंता वाढवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 27, 2024 | 05:02 PM
चीनी विमाने तैवानच्या हवाई हद्दीत; सलग तिसऱ्या दिवशीही घुसखोरी, अमेरिकेच्या हालचालींवर चीनची नजर

चीनी विमाने तैवानच्या हवाई हद्दीत; सलग तिसऱ्या दिवशीही घुसखोरी, अमेरिकेच्या हालचालींवर चीनची नजर

Follow Us
Follow Us:

तैपी: चीनने पुन्हा एकदा तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलग तिसऱ्या दिवशी चिनी लष्करी हालचालींनी तैवानची सुरक्षा चिंता वाढवली आहे. तैवानच्या सुरक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 17 चिमी विमाने आणि 7 जहाजे तैवानच्या सीमेजवळ दिसली आहेत. यापैकी 10 विमाने तैवानच्या हवाई हद्दीत घुसली आहेत. ही घुसखोरी चीनकडून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण लष्करी कारवायांचा बाग असल्याचे तैवानने म्हटले आहे.

याआधीही चीनने तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली होती

याआधीहीही चीनने अशाच प्रकारे तैवानच्या सीमेत घुसखोरी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 5 चिनी विमाने आणि 7 जहाजे तैवानच्या जवळ आली, त्यातील 4 विमाने तैवानच्या हवाई हद्दीत गेली होती. याशिवाय, 12 चिनी विमाने आणि 7 जहाजांनी सीमाशुल्क उल्लंघन केले. या घटनांमुळे तैवानने आपली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. तसेच तैवानने चीनला इशाराही दिला आहे की, त्यांनी पुन्हा असे केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्धविरामानंतर भारत-अमेरिकेचे मोठे वक्तव्य; जाणून घ्या काय म्हटले दोन्ही देशांनी?

अमेरिकन लष्करी हालचालींवर चीनचे लक्ष्य

मीडिया रिपोर्टनुसार, चीन अमेरिकन लष्करी हालचालींवर देखरेख करत असल्याचे दिसते. काल  अमेरिकन नौदलाच्या 7व्या फ्लीटच्या P-8A पोसेडॉन विमानाने चीन आणि तैवान दरम्यानच्या सागरी मार्गावरून उड्डाण केले. यावर चीनने आक्षेप घेतला असून, अमेरिकेची ही कृती प्रादेशिक शांततेला धोका असल्याचे म्हटले आहे. मात्र, अमेरिकेने आपल्या कारवायांचे आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत समर्थन केले आहे.चीन आणि तैवानमध्ये सुरू असलेल्या वादात अमेरिका हा तैवानला सर्वात मोठा शस्त्रास्त्रे पुरवणारा देश आहे.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

तैवानकडून होणाऱ्या पुस्तकांवर चीनकडून बंदी

याशिवाय, चीनने तैवानकडून निर्यात होणाऱ्या काही पुस्तकांवर देखील बंदी घातली आहे. या पुस्तकांमध्ये तैवानला स्वतंत्र देश म्हणून दाखवण्यात आले होते आणि दक्षिण चीन समुद्राचा उल्लेख चीनच्या भूभागाचा भाग म्हणून नव्हता. चीनने या पुस्तकांवर “वन चायना तत्त्वाचे उल्लंघन” केल्याचा आरोप केला आहे. जप्त करण्यात आलेली पुस्तके तैवानमधील शाळांसाठी होती. चीनच्या सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तैवानच्या पुस्तकांमध्ये वादग्रस्त नकाशे असून यामध्ये तैवान हा वेगळा देश असल्याचे दाखवण्यात आले आहे.

तैवानमधील सुरक्षा वाढवण्याचे प्रयत्न सुरू असताना, चीनच्या या घुसखोरीने जागतिक पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचा तैवानला पाठिंबा असल्याने चीन-तैवान वादाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Hindu Violence: चिन्मय दास यांचा जामीन अर्ज फेटाळला; तुरुंगात पाठवण्याचे बांगलादेश न्यायालयाचे आदेश

Web Title: Chinese planes enter taiwans airspace nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 05:02 PM

Topics:  

  • America
  • China
  • world

संबंधित बातम्या

Donald Trump US Farmers Crisis : ट्रम्पच्या धोरणांना अमेरिकन शेतकरीही त्रस्त! खते आणि डिझेलचे भाव 67% नी वाढले
1

Donald Trump US Farmers Crisis : ट्रम्पच्या धोरणांना अमेरिकन शेतकरीही त्रस्त! खते आणि डिझेलचे भाव 67% नी वाढले

Nidal Hasan: अमेरिकेत पहिल्यांदाच फाशीचे लाइव्ह स्ट्रीमिंग; 13 जणांच्या मारेकऱ्याला सरकार सर्वांसमोर घालणार गोळ्या, काय आहे कायदा?
2

Nidal Hasan: अमेरिकेत पहिल्यांदाच फाशीचे लाइव्ह स्ट्रीमिंग; 13 जणांच्या मारेकऱ्याला सरकार सर्वांसमोर घालणार गोळ्या, काय आहे कायदा?

Panama Earthquake: जमीन हादरली, इमारती कोसळल्या! पनामामध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप, अनेक देशांमध्ये त्सुनामी अलर्ट; थरारक VIDEO VIRAL
3

Panama Earthquake: जमीन हादरली, इमारती कोसळल्या! पनामामध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप, अनेक देशांमध्ये त्सुनामी अलर्ट; थरारक VIDEO VIRAL

US-Russia Oil Deal : इंधनाचे दर विक्रमी वेगाने घटणार? रशिया आणि अमेरिकेने केली एका मोठ्या ‘तेल’ कराराची घोषणा
4

US-Russia Oil Deal : इंधनाचे दर विक्रमी वेगाने घटणार? रशिया आणि अमेरिकेने केली एका मोठ्या ‘तेल’ कराराची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.