फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ढाका: बांगलादेशातील हिंदु संघटनेचे प्रमुखे आणि ISKCON चे सचिव चिन्मय प्रभु दास यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेवरुन बांगलादेशीतील हिंदू समाजात तीव्र आक्रोश निर्माण झाला होता. सर्व हिंदूंनी आंदोलने केली होती. तसेच ISKCON ने देखील याला विरोध दर्शवला होता. त्यांच्यावर देशद्राहोचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ISKCON याविरोधात न्यालयात त्यांच्या जामनीनाची याचिका दाखल केली होती. मात्र बांगलादेश न्यालयाने ही याचिका फेटाळली आहे.
दास यांचा जामीन अर्ज फेटाळला
मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेशातील हिंदू संघटनेचे नेते चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना तुरुंगात पाठवण्याचा आदेश चटगावच्या सहाव्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिला आहे. ‘संमित सनातनी जोत’चे नेते असलेल्या दास यांना ढाका येथील विमानतळावरून अटक करण्यात आली. त्यांच्यावर बांगलादेशाच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप आहे. तसेच आणखी काही 19 कार्यकर्त्यांलिरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Our statement on the arrest of Chinmoy Krishna Das:https://t.co/HbaFUPWds0 pic.twitter.com/cdgSx6iUQb
— Randhir Jaiswal (@MEAIndia) November 26, 2024
भारताने केली चिंता व्यक्त
दास यांच्या अटकेनंतर ISKCON ने भारत सरकारकडून बांगलादेश सरकारशी तात्काळ संपर्क साधण्याची मागणी केली होती. त्यानंतर भारताने दास यांच्या अटकेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत बांगलादेशाला अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी देण्याचे आवाहन केले होते. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले, मंदिरांची तोडफोड, आणि अन्याय्य गुन्हेगारी कारवाया रोखणे गरजेचे आहे. धार्मिक नेत्यावर आरोप ठेवले जात असताना या घटनांचे दोषी मोकळे फिरत असल्याबद्दलही मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
हिंदूवर पुन्हा एकदा हल्ले
बांगलादेशात चिन्मय दास यांच्या अटकेनंतर हिंदू समुदायात तीव्र प्रतिक्रिया उमटली असून देशभरात खळबळ उडाली आहे. तसेच बांगलादेश हिंदू बौद्ध ईसाई एकता परिषदेकडून चिन्मय यांच्या अटकेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.चटगाव महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या जामीन अर्जाला नकार देत तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. दास यांच्यावर 30 ऑक्टोबर रोजी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ हिंदू समाज रस्त्यावर उतरल्यावर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात 50 हून अधिक लोक जखमी झाले असून अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असून, परिस्थिती तणावपूर्ण आहे. भारत आणि इस्कॉन यांच्यासह विविध संघटनांनी या प्रकरणात बांगलादेश सरकारने लवकरच ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. या घटनांमुळे बांगलादेशातील हिंदू समुदायात चिंता व्यक्त केली जात आहे.