Chinese scientists created ‘super diamond’ harder than real thing
बिजिंग: कल्पना करा तुम्हाला जर असा हिरा मिळाल, जो खऱ्या हिऱ्याशी तंतोतंत जुळतो, तर? तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. तर होय हे शक्य आहे, कारण चीनच्या वैज्ञानिकांनी हे स्वप्न सत्यात उतरवले आहे. त्यांनी एका अनोख्या ‘सुपर डायमंडची’ची रचना केली आहे. हा हिरा केवळ कृत्रिमच नव्हे तर खऱ्या हिऱ्यांना देखील मागे टाकतो. तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.
सुपर डायमंडची निर्मिती
मिळालेल्या माहितीनुसार, ही निर्मिती चीनच्या जिलिन विद्यापीठातील संशोधकांनी केली असून, त्यांनी बनवलेला हिरा नैसर्गिक हिऱ्याशी तंतोतंत जुळतो, तसेच सख्त आणि टिकाऊ आहे. यासाठी विद्यापीठाने ग्रेफाइटला विशिष्ट दाबाखाली संकुचित करून उच्च दर्जाच्या हेक्सागोनल हिर्याचा (लॉन्स्डेलाइट) निर्माण केला आहे.
साधारणपणे प्राकृतिक हिऱ्यांची अणु संरचना क्यूबुक असते, यामुळे ते कडक बनतात. मात्र, हेक्सागोनेक संरचना अधिक कडक असते, जी उल्कापाताच्या धक्क्यामुळे निर्माण होते. या संरचनेचे हिरे लॅमध्ये तयार करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करत आले आहे, परंतु शास्त्राज्ञांना त्यात अपयश आले. आता चीनच्या वैज्ञानिकांनी ही कठीण समस्या सोडवली आहे.
नैसर्गिक हिऱ्यांपेक्षा कठीण
मिळालेल्या माहितीनुसार, हा सुपर डायमंड कडक असून याचा कडकपणा या GPa मोजली गेली असून ही नैसर्गिक हिर्यांच्या 100 GPa च्या तुलनेत खूप जास्त आहे. याशिवाय, हा हिरा 1 हजार 100 डिग्री सेल्सियस तापमानाला देखील सहज सहन करू शकतो. हा हिरा फक्त अधिक कडकच नाही, तर तो उष्णतेतही आपल्या गुणधर्मांचे रक्षण करतो.
व्यापाराच्या दृष्टीने फायदेशीर?
या सुपर डायमंडच्या औद्योगिक वापराच्या दृष्टीने अनेक फायदे असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. हा हिरा कटिंग, ड्रिलिंग आणि खाणकामाच्या प्रक्रियांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. याशिवाय, बांधकाम, वैद्यकीय उपकरणे, आणि अत्यंत टिकाऊ साहित्याच्या निर्मितीतदेखील याचा उपयोग होऊ शकतो. या शोधामुळे उच्च सख्त सामग्रीच्या निर्मितीत नवा दृष्टीकोन मिळाला असून याचा औद्योगिक क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो.
दागिने बनवण्यासाठीही वापर
सध्या या सुपर डायमंडचा मुख्य वापर औद्योगिक प्रक्रियांसाठी होणार आहे, मात्र वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, भविष्यात दागिने बनवण्यासाठीही याचा वापर होऊ शकतो. या हिऱ्याचा कडकपणा आणि टिकाऊपणामुळे उच्च-गुणवत्तेचे दागिने तयार होतील. तंत्रज्ञानाच्या विकासासोबतच याचा ज्वेलरी उद्योगात या हिऱ्याचा वापर होण्याची शक्यता आहे. या अनोख्या शोधामुळे अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे, आणि उच्च गुणवत्तेच्या टिकाऊ साहित्य निर्मितीसाठी हा एक नवा मार्ग उघडला गेला आहे.