युक्रेन युद्ध थांबेल का? सौदी अरेबियातील रशिया बैठकीचा अमेरिकेला फायदा, नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका आणि रशियाच्या राजनियकांनी सौदी अरेबियात बैठक घेतली. या बैठकीचा मुख्य उद्देश तीन वर्षापासून सुरु असलेल्या युद्धाचा शेवट करण्यासाठी चर्चा करणे हा होता. मात्र, रशिया-युक्रेन युद्ध सुरु राहिल की थांबेल, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. कारण या बैठकीत अमेरिका-रशिया संबंध वाढवण्यावर भर देण्यात आला. तसेच या बैठकी पूर्वीच अमेरिकेला मोठा फायदा झाला होता.
अमेरिकन ड्रग्ज तस्कराला सोडण्याचा रशियाचा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीपूर्वी रशियाने एक अमेरिकन नागरिक कैलॉब बायर्सला सोडण्याचा निर्णय घेतला. या नागरिकाला ड्रग्स ठेवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मीडिया रिपोर्टनुसार, मास्कोच्या व्नुकोवो विमानतळावर बायर्सला ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याला 10 वर्षाच्या कारावसाची शक्यता होती. मात्र, रशियाने एक सकारात्मक पावलाचा भाग म्हणून त्याला सोडले आणि अमेरिकन दूतावासाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दोन्ही देशांत दूतावासावरील बंदी हटवली
सध्या सौदी अरेबियामध्ये रशिया आणि अमेरिकेमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये आपले दूतावास पुन्हा उघडण्यावर सहमती झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दूतावासांमध्ये स्टाफची भरती लवकरच करण्यात येणार आहे. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. 2022 मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही देशांनी दूतावास बंद केला होता, मात्र आता तो पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
आणखी एका गुन्हेगाराची मुक्तता
रशियाने बायर्सला सोडण्याच्या आधी अमेरिकेच्या आणखी एका नागरिक मार्क फोगलला मुक्त केले होते. फोगलला 14 वर्षांची शिक्षा झाली होती, मात्र तीन वर्षांनी त्याची सुटका करण्यात आली. अमेरिकेने याच्या बदल्यात एक रशियन सायबर गुन्हेगार अलेक्झांडर विनिकला सोडले होते.
अजून 10 नागरिक रशियाच्या कैदेत
अमेरिकेचे आणखी 10 नागरिक रशियाच्या कैदत आहेत. यामध्ये 73 वर्षीय स्टीफन हबर्ड, याला युक्रेनच्या युद्धात भाग घेतल्याच्या आरोपाखाली सात वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली. मात्र, त्यांच्या कुटूंबीयांनी दावा केला की, त्याने कधीही शस्त्र उचलले नव्हते. याचप्रमाणे क्सेनिया कारेलिना या रशियन-अमेरिकन नागरिकाला एका अमेरिकी संस्थेला 50 डॉलर देणगी दिल्यामुळे 12 वर्षांची शिक्षा झाली आहे.
सध्या रशिया-युक्रेन युद्धाचा शेवट का असेल ते सांगणे कठीण आहे, मात्र अमेरिकेन सौदी अरबियात झालेल्या या चर्चेतून आपले हित साधले आहे. या चर्चेतून अमेरिकेने आपल्या नागरिकांची सुटका करुन कूटनीतिक विजय मिळवला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये थोडेफार संबंध सुधारले असून येत्या काळात आणखी काय घडेल हे पाहणे महत्वाचे आहे.
रशिया-अमेरिका संबंधांमुळे युरोप चिंतेत
सध्या रशिया-अमेरिकेच्या वाढत्या संबंधामुळे युरोपने भीती व्यक्त केली आहे. युरोपच्या मते, या चर्चेमधून शांती करार झाला आणि रशियावर कोणत्याही कडक निर्बंध लागू करण्यात आले नाहीत, तर रशिया पुन्हा आपल्या विस्तारवादी धोरणांना पुढे नेऊ शकतो. विशेषतः पोलंड, बाल्टिक देश आणि जर्मनीला रशियाकडून भविष्यातील आक्रमणाची भीती वाटत आहे. त्यामुळे युरोप युद्धाचा शेवट रशियाच्या स्पष्ट पराभवाने व्हावा, अशी भूमिका घेत आहे.