
chinse weapons performed well in operation sindoor says pakistan
फोटो काढायला गेला अन्… ; चीनच्या माउंट नामा पर्वतावरुन कोसळून गिर्यारोहकाचा दु:खद मृत्यू, VIDEO
पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, चिनी शस्त्रांनी मे महिन्याच्या युद्धात उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा जागतिक स्तरावर अपमान झाला आहे. त्यांच्यावर लोक हसत आहे.
पण लष्करी तज्ज्ञांच्या मते, चिनी शस्त्रांस्त्रांना भारताच्या स्वदेशी शस्त्रांस्त्रांविरोधात वापरण्यात आले होते, मात्र पाकिस्तानी ही रणनीती पूर्णपणे कुचकामी ठरली आहे. भारताच्या ताकदीसमोर चिनी शस्त्रे आणि त्यांची संरक्षण प्रणाली क्षणभरही टिकली नाही. युद्धात पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
मे महिन्यात पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र संघर्ष झाला होता. यावेळी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अतंर्गत पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केली होती. २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या (Pahalagam Attack) बदल्यात ही कारवाई करण्यात आली होती. यामध्ये २६ नागरिकांचा बळी गेला होता.
यानंतर दोन्ही देशात चार दिवस युद्ध सुरु होते. यामध्ये भारताने पाकिस्तानला अचूक हल्ल्यांनी परभूत केले होते. यामुळे पाकिस्तानने शरणागती पत्कारली आणि १० मे २०२५ रोजी युद्धबंदी झाली.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरवरुन काय दावा केला?
पाकिस्तानने पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरवरमध्ये चिनी शस्त्रांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचा दावा केला.
प्रश्न २. पाकिस्तानच्या या दाव्यावर लष्करी तज्ज्ञांनी काय म्हटले?
लष्करी तज्ज्ञांच्या मते, चिनी शस्त्रांस्त्रांना भारताच्या स्वदेशी शस्त्रांस्त्रांविरोधात वापरण्यात आले होते, मात्र पाकिस्तानी ही रणनीती पूर्णपणे फेल ठरली.
प्रश्न ३. भारताने पाकिस्तानची कोणती शस्त्रे युद्धात उद्ध्वस्त केली?
भारताने युद्धात पाकिस्तानची चिनी चे J-10 लढाभ विमान आणि अनेक पाकिस्तान लष्करी विमाने उद्ध्वस्त केली आहेत. चिनची संरक्षण प्रणाली देखील भारताने युद्धात नष्ट केली होती.