Civil war erupts again in Syria, 37 people killed, more than 100 injured in communal clashes
दमास्कस : सीरियामध्ये पुन्हा एकदा संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. सीरियामध्ये सोमवारी डुझबहुल स्वेडा शहरात सामुदायिक संघर्ष झाला. यामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रुझ आणि बेदुइन समुदायांमध्ये हिंसाचार घडला. यासाठी सीरियाच्या अल-जुलानी सरकारला जबाबदार धरण्यात आले आहे.
गेल्या वर्षीच्या २०२४ च्या अखेरीस सीरियामध्ये अल-जुलानी यांच्या हयात तहरीर या बंडखोर गटाची सत्ता स्थापन झाली होती. अल-जुलानी यांच्या नेतृत्वाखाली बंखोरांनी बशर अल-असदची सत्ता संपुष्टात आणली होती. यानंतर सीरियावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता. परंतु अद्याप हयात तहरीर गटाला अद्याप सीरियावर पूर्ण नियंत्रण मिळवता आले नाही. अल-जुलानी यांनी देशात शांतता प्रस्थातपित करण्याचे म्हटले होते, परंतु यामध्ये ते अपयशी ठरताना दिसत आहे.
सीरियन सरकारशी कुर्दीश दहशतवाद्यांचा संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष सुरु असतानाच ड्रुझ आणि बेदुइन समुदायांमध्येही हिंसाचार वाढत आहे. ब्रिटनस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्स संस्थेने, सध्या सीरियामध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले असल्याचे म्हटले. तसेच प्रत्यक्षदर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार, दमास्क ते स्वेदाला जोडणाऱ्या महामार्गावर ड्रुझ समुदायाच्या एका व्यापाराला अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर हा संघर्ष उफाळला.
🔻Clashes between Druze separatist militias and local tribes in Suwayda province Clashes started as the separatist militias (who control the province) started an attack on Al-Maqwas neighbourhood in the city after tensions in the last 24 hours (kidnappings on both sides)#Syria pic.twitter.com/eTTdNDHc0W — Kurdish Observer (@KurdishObserve) July 13, 2025
दरम्यान या संघर्षासाठी सीरियाच्या नव्या सरकारला जबाबदार धरण्यात आले हे. ड्रुझ समुदायाने यासंबंधी एक निवेदन जारी केली आहे. या निवेदनात समुदायाचे प्रमुख रेजल अल-करामाह यांनी म्हटले आहे की, सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेतील बेजबाबदारपणामुळे हा हिंसाचार घडला. सध्या सीरियन सरकार देशात अशंतात निर्माण करत आहे. यामुळे नागरिकांना धोका निर्माण होत आहे, असे या निवेदनात सांगण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वी देखील ड्रुझ समुदायाचे सदस्य आणि सुरक्षा दलंमध्ये चकामक झाली होती. यामध्ये डझनभर लोक मृत्यूमुखी पडले होते.
ड्रुझ समुदायाचे प्रमुख रेजल अल-करामाह यांनी त्यांच्या समुदायाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या सीरियामध्ये ड्रुझ समुदायाचे सुमारे ७ लाख लोक राहतात. यामध्ये स्वेडा शहरात सर्वाधिक ड्रुझ लोक आहेत. गेल्या अनेक काळापासून ड्रुझ समुदाय आणि बेदुइनमध्ये संघर्ष सुरु आहे.