
Bangladesh High Commission Left India
बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद परदेशात; लंडनमध्ये दिपू दासच्या हत्येविरोधात तीव्र निदर्शने
२०२४ मध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर भारतसोबतचे संबंध बिघडले आहे. बांगलादेशातील राजकीय अस्थिरता, आर्थिक दबाव आणि हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांमुळे दोन्ही देशांच्या संबंधामध्ये कटुता निर्माण झाली आहे.भारताने बांगलादेशला देशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात कारवाईची मागणी केली आहे, मात्र बांगलादेशने यावर मौन पाळले आहे. याउलट बांगलादेशने भारतातील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यावर चिंता वर्तवली आहे.
सध्या बांगलादेशात फ्रेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. परंतु या निवडणुकांपूर्वी बांगलादेशात हिंसक निदर्शने सुरु आहेत. ढाक्यातील भारताच्या उच्चायुक्त प्रणव वर्मा यांनी बांगलादेशातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. विशेष करुन हिंदूवरील वाढत्या हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध केला आहे. सध्या भारत आणि बांगलादेशातील राजनैतिक संबंध गुंतागुंतीचे झाले आहे.यामुळे बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्त रियाज हमीदुल्ला ढाक्याला यावर चर्चेसाठी परतले आहेत. तज्ज्ञांच्या मते, युनूस यांच्या कार्यकाळाता बांग्लादेश राजनैतिकदृष्ट्या कमकुवत आणि दिशाहिनी झाला आहे. तसेच देशाची परराष्ट्र धोरणे देखील स्पष्ट नाहीत. यामुळे बांगलादेशात परिस्थिती अधिक चिंताजनक आहे.
दरम्यान माजी राजदूत महफूर रहमान यांनी भारताने बांगलादेशसोबत संबंध सुधारण्याची तयारी दाखवली आहे. परंतु मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) सरकार या संधीचा गैर-उपयोग करत आहे. देशांतर्गत राजकीय दबावामुळे बांगलादेश सरकारचा दृष्टीकोन कमकुवत झाला आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आतापर्यंत १५०० हून अधिक हिंसाचाराच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. सध्याही उस्मान हादीच्या हत्येवरुन आणि हिंदूंवरील अत्याचारावरु बांगलादेशात गोंधळ सुरु आहे. ही परिस्थिती येत्या फ्रेब्रुवारीत १२,२०२६ ला होणाऱ्या निवडणुकांसाठी धोक्याची मानली जात आहे. निवडुणका निष्पक्ष आणि शांततापूर्ण होणार का असा प्रश्न व्यक्त केला आहे. या सर्व समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि भारत-बांग्लादेश संबंध पुन्हा ठीक करण्यासाठी उच्चायुक्त रियाझ हमीदुल्ला ढाकाला परतलेआहेत.