Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Columbia Election : कोलंबियात गदारोळ! ट्रम्प समर्थित उमेदवाराच्या विजयानंतर रस्त्यावर आग; आंदोलकांनी अमेरिकन झेंडे जाळले?

Columbia Election Result 2026 : कोलंबियात मोठा हिंचासार उफाळला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प समर्थित नेत्याच्या विजयाने संतापाची लाट उसळली आहे. डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी निकालात अमेरिकेचा हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. अमेरिकन झेंडे जाळले गेले असल्याचे सांगितले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 22, 2026 | 10:26 AM
Columbia

Columbia

Follow Us
Follow Us:
  • कोलंबियात गदारोळ
  • ट्रम्प-समर्थित उमेदवाराच्या विजयानंतर रस्त्यावर आग
  • आंदोलकांनी अमेरिकन झेंडे जाळले?
Columbia Election Result : अलीकडेच कोलंबियात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांचा २१ जून २०२६ रोजी निकाल लागला असून उजव्या विचारणीचे नेते अबेलार्दो डी ला एस्प्रिएला यांचा विजय झाला आहे. मात्र त्यांच्या या विजयानंतर कोलियांबात हिंसाचार उफाळला आहे. अबेलार्दो हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प समर्थित नेते मानले जातात. यामुळे कोलिबांयाच्या तिसऱ्या मोठ्या शहर कालीमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. या लोकांनी अमेरिकन झेंडे जाळले असल्याची माहिती समोर आली आहे.

Meloni Trump Controversy : ‘स्वत:च्या लोकप्रियतेवर लक्ष्य द्या’ ; ट्रम्प यांच्या आरोपांवर मेलोनींचे सडेतोड उत्तर

नेमकं काय घडलं?

३१ मे रोजी कोलंबियात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली होती. परंतु या फेरीत कोणत्याही नेत्याला ५० टक्क्याहून अधिक मते न मिळाल्याने २१ जून रोजी पुन्हा फेर निवडणूक घेण्यात आली. यावेळी उजव्या विचारसरणीचे अबेलार्दो दे ला एस्प्रिएला यांचा विजय झाला. त्यांनी डाव्या विचारसरणीचे इव्हान सेपेदा यांचा अत्यंत कमी फरकारने परभव केला. अबेलार्दो यांना ४९.६५% तर इव्हान यांना ४८.७०% मते मिळाली.

ट्रम्प समर्थित नेत्याच्या विजयाने कोलंबियात गदारोळ

अबेलार्दो यांना ट्रम्प समर्थित नेते मानले जाते. या निवडणुकीत ट्रम्प यांनी पाठिंबा दिला होता. त्यांच्या विजयामुळे अमेरिका आणि कोलंबितील संबंध सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु डाव्या विचारसरणीच्या लोकांनी निवडणुकीच्या निकालात अमेरिकन हस्तक्षेप झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे विरोधकांनी अमेरिकन झेंडे जाळले असल्याचे सांगितले जात आहे.

निकाल जारी झाल्यानंतर निवृत्त होणारे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेत्रो यांनीही मतांची पुन्हा सखोल मोजणी करण्याची मागणी केली आहे. निवडणूक सॉफ्टवेअर हॅक झाल्याचा आरोप पेत्रो यांनी केला आहे. परंतु याबाबत कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही.

बंडखोर गटांविरोधात कारवाई

अबेलार्डो स्वत:चा उल्लेख वाघ म्हणून करतात. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी सत्तेवर आल्यावर बंडखोर गटांशी शांतता चर्चा रद्द केली जाईल असे सांगितले होते. तसेच या बंडखोर गटांविरुद्ध लष्करी कारवाईची घोषणाही केली आहे. सध्या त्यांच्या या आक्रमक घोषणांमुळे कोलंबियात राजकीय आणि सामाजिक अशांतता पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोलंबियात बंडखोर गट गुरिल्लासोबत दहा वर्षांपूर्वी शांतता करार झाला होता. परंतु तरीही अनेक भारांमध्ये या टोळ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करतात. कोलंबियातील काही विशिष्ट भागांमध्ये या गटांचे वर्चस्व अद्यापही संपुष्टात आलेले नाही. अशा परिस्थिती या गटाविरोधात लष्करी कारवाई आणखी अस्थिरता निर्माण करेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Tras los resultados, los vándalos petristas vuelven a mostrar su verdadero rostro.
No son opositores, son parásitos del Estado fallido que salen a las calles a sembrar destrucción, caos y violencia.
Basura humana que no respeta al pueblo, ni sus decisiones, ni sus…
— Jhonf Fonseca (@Jhonffonseca) June 22, 2026


Keir Starmer Resign : ब्रिटनच्या राजकारणात मोठी उलथापालथ! PM स्टार्मर आज राजीनामा देणार? त्यांच्याच पक्षातील खासदारांकडून मागणी

Web Title: Columbia election result 2026 trump backed candidate wins protests erupt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

India At UN: दहशतवाद्यांना पोसणारी यंत्रणाच नष्ट करा; अल-कायदा अन् लश्करवरून भारताची जागतिक मंचावर गर्जना
1

India At UN: दहशतवाद्यांना पोसणारी यंत्रणाच नष्ट करा; अल-कायदा अन् लश्करवरून भारताची जागतिक मंचावर गर्जना

Syria Parliament Decision: सीरियाच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय; असाद-कालीन वादग्रस्त ‘दहशतवाद न्यायालय’ पूर्णपणे रद्द
2

Syria Parliament Decision: सीरियाच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय; असाद-कालीन वादग्रस्त ‘दहशतवाद न्यायालय’ पूर्णपणे रद्द

Saudi Travel Advisory: येमेन सीमेवर ‘Level-4’ सुरक्षा अन् बंदी; सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नवे निर्बंध
3

Saudi Travel Advisory: येमेन सीमेवर ‘Level-4’ सुरक्षा अन् बंदी; सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नवे निर्बंध

Makkah Drone Attack: मक्काजवळ ड्रोन हल्ला उधळला, भारताने व्यक्त केली चिंता; सौदीने हुथींना दिला ‘रेड लाईन’चा इशारा
4

Makkah Drone Attack: मक्काजवळ ड्रोन हल्ला उधळला, भारताने व्यक्त केली चिंता; सौदीने हुथींना दिला ‘रेड लाईन’चा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.