Keir Starmer Resign : ब्रिटनच्या राजकारणात मोठी उलथापलथ! PM स्टार्मर आज राजीनामा देणार? त्यांच्याच पक्षातील खासदारांनकडून मागणी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Trump on Hormuz : होर्मुझवर टोल वसूल करणार अमेरिका? इराण कराराबाबत ट्रम्प यांनी स्पष्टचं सांगितलं
ब्रिटिश माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टार्मर यांच्याच लेबर पक्षातील खासदारांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेबर पक्षातील जवळपास, ९५ खासदारांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितले. जानेवारी २०२६ पासूनच त्यांच्याबद्दल खासदारांचे नकारात्मक मत झाले होते.
स्टार्मर यांची लोकप्रियता जनतेमध्येही कमी होत चालली आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये लेबर पक्षाच्या सततच्या पराभवामुळे, जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) प्रकरणाशी जोडले गेल्यामुळे, देशाच्या संरक्षण खर्चावरुन आणि पक्षातील मंत्र्यांच्या राजीनाम्यांवरुन स्टार्मर यांटी लोकप्रियता ढासळली असल्याचे दिसून आले आहे.
गेल्या आठवड्यात ब्रिटनच्या मेकर्सफील्ड पोटनिवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीत अँडी बर्नहॅम यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. या निकालानंतर अँडी बर्नहॅम यांची लोकप्रियता पाहता पक्षातील अनेक जेष्ठ नेत्यांनी स्टार्मर यांना पाउतार होण्यास सांगितले.
अँडी बर्नहॅम हे लेबर पक्षाचेच नेते असून अत्यंत लोकप्रिय नेते मानले जातात. यामुळे स्टार्मर यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. याशिवाय माजी आरोग्यमंत्री वेस स्ट्रीटींग यांनी देखील पंतप्रधान पदासाठी नेतृत्त्वस्पर्धेत उतरण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांना ८१ लेबर खासदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी देखील स्टारमर राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीरपणे, कीर स्टार्मर राजीनामा देतील असे म्हटले. ट्रम्प यांच्या मते, स्टारमर स्थलांतर आणि उर्जा धोरणांबाबत योग्य निर्णय घेण्यावर अपयशी ठरले आहेत.
सध्या लेबर पक्षातील खासराकांडून कीर स्टारमर यांनी स्वत:चा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. यामुळे घसरती लोकप्रियता, एपस्टाईन प्रकरण, स्थानिका निवडणुकांमधील पराभव आणि पक्षांतर्गत बंडामुळे स्टारमर यांच्यावर दबाव निर्माण झाला आहे. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे सध्या त्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण ब्रिटनचे लक्ष लागले आहे.
ओस पडलेले रस्ते, मद्य विक्रीवर बंदी…, G-7 शिखर परिषद संपताच फ्रान्समध्ये गोंधळ; कारण काय?






