Controversy erupts in Indian politics over US H1-B visa fee
H-1B Visa News in Marathi : वॉशिग्टन/नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी काल H-1B व्हिसा शुल्कवाढीच्या निर्णयावर स्वाक्षरी केली. आता H-1B व्हिसा शुल्कात १ लाख अमेरिकन डॉलर पर्यंत म्हणजे भारतीय रुपयात ९० लाख रुपयांपर्यंl शुल्क लागू केले जाणार आहे. मात्र ट्रम्प यांच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसण्याची शक्यता आहे. सध्या त्यांच्या या निर्णयावरुन भारतीय राजराकणात वाद पेटला आहे.
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारताच्या आयटी क्षेत्राला मोठ धक्का बसण्याची शक्यत आहे. तसेच यामुळे व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक ताण वाढेल. हा नियम जुन्या व्हिसा धारकांना लागू होणार नसून केवळ नवीन H-1B व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांवर लागू होणार आहे. पण भारतातून दरवर्षी अनेक लोक नोकऱ्यांसाठी जातात.
H-1B Visa : ट्रम्प यांचा $100,000 व्हिसा शुल्क नियम आजपासून होणार लागू; भारतीयांना बसणार फटका
ट्रम्प यांच्या या निर्णायमुळे सध्या भारतातच्या राजकारणात गोंधळ सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली जात आहे. आप आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, १४० कोटी लोकंचे नेतृत्व करणारे पंतप्रधान इतके कमकुवत आहेत. का? अमेरिकेच्या या निर्णयावर भारत सरकाने कठोर भूमिका घेतली पाहिजे असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधाकांनी देखील केंद्र सरकारवर हल्ला केला आहे.
कॉंग्रेसने देखील मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांच्या मते, ट्रम्प यांच्या या निर्णायामुळे भारतीय आयटी उद्योगांना आणि व्यावसायिकांवर परिणाम होणार आहे. कॉंग्रेसने मोदी सरकाच्या परराष्ट्र धोरणातील अपयश म्हणून या निर्णयाकडे पाहत आबे. पक्षाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर जास्त लक्ष देतात, मात्र समस्या मांडण्यात आणि ती सोडवण्यात येत नाही.
याच वेळी सरकारच्या बाजूने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी, सध्या या निर्णयाचा अभ्यास सुरु असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, उद्योग क्षेत्र, तंत्रज्ञान कंपन्या, आणि इतर भागीदारांशी यावर चर्चा सुरु आहे. या कपंन्यांनी मान्य केले आहे. या शुल्कवाढीमळे अनेकांना आर्थिक आणि सामाजिक अडचणींचा सामना करावा लागेल. पण सध्या भारत अमेरिकेशी चर्चा करत आहे. यामुळे या निर्णायाचा नकारात्मक परिणा होऊ दिला जाणार नाही असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
सध्या H-1B व्हिसा शुल्क वाढीमुळे देशात राजकारणा पेटले आहे. यामुळे केवळ भारतच नाही तर अमेरिकन उद्योगांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काही दिवसांत भारत आणि अमेरिका संबंध आणि देशातील आर्थिक परिस्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
अमेरिकेने H-1B व्हिसा शुल्कात किती वाढ केली?
अमेरिकेने H-1B व्हिसा शुल्कात १ लाख अमेरिकन डॉलर पर्यंत म्हणजे ९० लाख भारतीय रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
अमेरिकेच्या या निर्णयाचा भारतावर काय होणार परिणाम?
अमेरिकेच्या H-1B व्हिसावरील शुल्क वाढीमुळे भारतीय आयटी क्षेत्रावर, व्यावसायिकांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे.
भारत सरकारने अमेरिकेच्या या निर्णयावर काय भूमिका घेतली आहे?
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, सध्या या निर्णायवर अभ्यास सुरु आहे, लवकरच अमेरिकेशी चर्चा करुन समस्येचे निराकरण करण्यात येईल.
भारतीयांना धक्का! H1B व्हिसावर अमेरिकेने लागू केले १ लाख डॉलर शुल्क; जाणून घ्या काय होणार परिणाम?