Controversy over hijab rules ignites in Iran after Iran's leader daughter wears revealing wedding dress
Iran News in Marathi : तेहरान : एक मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे. इराणमध्ये (Iran) हिजाबच्या नियमावरुन पुन्हा एकदा सामान्य आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाद पेटला आहे. इराणमध्ये हिजाब न घालणाऱ्या महिलांना अटक केली जाते, त्यांचा सामाजिक छळ केला जातो. मात्र इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मुलीने लग्नात स्ट्रॅपलेस गाऊन घातल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या जवळचे सल्लागार आणि इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे माजी सचिव अली शमखानी यांच्या मुलीचे लग्न होते. यावेळी लग्न सोहळ्यात त्यांच्या मुलीने स्ट्रॅपलेस गाऊन घातला होता. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शमखानी यांची मुलगीन फतेमेहने लग्नात स्ट्रॅपलेस ड्रेस, नेकलेस अशा पद्धतीचा पाश्चात्य गाऊन परिधान केला होता. मात्र याचा व्हिडिओ व्हायरल होताच इराणी नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. नागरिकांच्या मते, जिथे सामान्य लोकांना हिजाब घालण्यासाठी जबरदस्ती केली जाते, तिथे सत्ताधारी पक्षाच्या घरातील सदस्यांसाठी नियम पूर्णपण वेगळे आहेत.
इराणच्या एका पत्रकाराने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. पोस्ट शेअर करताना लिहिले आहे की, जे शासन त्यांच्या देशातील महिलांना केस दिसल्यामुळे, हिजाब न घातल्यामुळे त्रास देते, त्यांचा सामाजिक छळ करते, त्यांना अटक करेत, त्याचा शासनातील अधिकाऱ्यांच्या मुली पाश्चात्य पोशाख परिधान करता. सामान्य महिलांना असे केल्यास त्यांना अमानुष वागणूक दिली जाते, असे का? श्रीमंतांसाठी वेगळे नियम आहेत का? असे लिहिले आहे.
The daughter of Ali Shamkhani one of the Islamic Republic’s top enforcers had a lavish wedding in a strapless dress. Meanwhile, women in Iran are beaten for showing their hair and young people can’t afford to marry. This video made millions of Iranian furious. Because they… https://t.co/MAb9hNgBnN pic.twitter.com/WoRgbpXQFA — Masih Alinejad 🏳️ (@AlinejadMasih) October 19, 2025
या व्हिडिओवर इराणच्या नागरिकांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे. हिजाबचे नियम फक्त सामान्य लोकांसाठी का? आता वरिष्ठ लोकांच्या घरातील सदस्यांच्या अशा वागण्याने इस्लामाचा अनादर होत नाही का? असे प्रश्न केले जात आहे. यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. या व्हिडिओवर तीव्र टीका केली जात आहे. नागरिकांच्या मते, हा प्रसंग एक ढोंगीपण आहे. इराणमधील सरकार जगाला वेगळा चेहरा दाखवते आणि तेथील लोकांना वेगळे आहे. नियम केवळ सामान्यांसाठी आहेत, सत्ताधारांसाठी नाहीत.
प्रश्न १. इराणमध्ये कोणत्या कारणावरुन पेटला वाद?
इराणमध्ये हिजाबच्या नियमावरुन सामान्य नागरिकांमध्ये वाद पेटला आहे.
प्रश्न २. इराणमध्ये हिजाबच्या नियमावरुन का सुरु झाला वाद?
इराणच्या सर्वोच्च राष्ट्राय सुरक्षेचे माजी सचिव यांच्या मुलीने लग्नात स्ट्रॅपलेस गाऊन परिधान केला होता, ज्यावरुन हिजाबवादाला तोंड फुटले आहे.