तिबेटमध्ये भूकंपात मृत्यूचा आकडा वाढला; 126 जणांचा बळी तर 188 जण जखमी
नेपाळ-तिबेट: तिबेटमध्ये 7.1 तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठी हानी झाली असून आत्तापर्यंत 126 लोकांचा मृत्यू झाला आणि 188 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तिबेट स्वायत्त प्रदेशातील शिगात्से शहराच्या डिंगरी काउंटीमध्ये सकाळी 9.05 वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू सोगो गावात होता, जिथे 10 किलोमीटर खोलीपर्यंत भूकंपाचे परिणाम जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, 9 तासांमध्ये 100 पेक्षा जास्त लहान-मोठे भूकंपाचे धक्के जाणवल्याने संपूर्ण शहर मलब्यात बदलले.
तिबेटमधील अनेक घरे उद्धवस्त
याशिवाय, या भागात 27 खेड्यांमध्ये सुमारे 6,900 लोक राहतात. हा प्रदेश माउंट एव्हरेस्टच्या उत्तरी आधारशिविराजवळ असून भूकंपामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. चीनच्या आपत्ती निवारण मुख्यालयाने 3,400 बचाव कर्मचाऱ्यांना आणि 340 वैद्यकीय तज्ञांना घटनास्थळी पाठवले आहे. तिबेटमधील भूकंपाचा परिणाम शेजारील नेपाळ आणि भारतातही जाणवला. नेपाळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये लोक घराबाहेर पडले आहेत. परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच बिहारसह भारतातील इतर भागांमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
बचाव आणि पुनर्वसन कार्य सुरू
तिबेट धार्मिक गुरु दलाई लामांनी या आपत्तीवर दुःख व्यक्त करत मृतांच्या आत्म्यांसाठी प्रार्थना केली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बचाव आणि पुनर्वसन कार्य त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तिबेट धार्मिक गुरु दलाई लामांनी या आपत्तीवर दुःख व्यक्त करत मृतांच्या आत्म्यांसाठी प्रार्थना केली.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बचाव आणि पुनर्वसन कार्य त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चीनने भूकंपामुळे जलाशयांवर कोणतीही हानी झाली नसल्याचे चीनने सांगितले आहे. मात्र, ब्रह्मपुत्र नदीवर मोठा धरण बांधण्याच्या चीनच्या योजनांवर तज्ज्ञांनी भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या धोका तज्ञांनी व्यक्त केला आहे.
पर्यटन स्थळे तात्पुरती बंद
तिबेट पठार हे यूरेशियन आणि भारतीय टेक्टोनिक प्लेट्सच्या टकरावाच्या ठिकाणी असल्याने भूकंपासाठी संवेदनशील मानले जात आहे. तिबेट शहर शिगात्से, भारताच्या सीमेच्या जवळ असून पंचेन लामांचे धार्मिक केंद्र आहे. सरकारी चिनी माध्यमांनी दाखवलेल्या दृश्यांमध्ये मलब्यातून नागरिकांना बाहेर काढताना दाखवले आहे.
भूकंपानंतर माउंट एव्हरेस्ट परिसरातील पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. सध्या या भागात मदतकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. भूकंपामुळे निर्माण झालेली विनाशकारी परिस्थितीने तिब्बत आणि शेजारील प्रदेशांमध्ये हाहाकार माजवला आहे. भविष्यातील धोक्याचा अंदाज घेत स्थानिक प्रशासन लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे.