Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आई, मला शेवटचं पाहून घे, कदाचित…’ 23 वर्षीय महिला वैमानिकाने वाचवले 169 प्राण

युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना मायदेशी परत आणण्याने प्रयत्न सुरु होते. आणि मग ही जबाबदारी देण्यात आली ती एका 23 वर्षीय महिला पायलटकडे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 13, 2026 | 01:22 PM
‘आई, मला शेवटचं पाहून घे, कदाचित…’ 23 वर्षीय महिला वैमानिकाने वाचवले 169 प्राण
Follow Us
Follow Us:
  • ‘आई, मला शेवटचं पाहून घे, कदाचित…’
  • ‘ 23 वर्षीय महिला वैमानिकाने वाचवले 169 प्राण
इराण इस्त्रायल युद्ध पेटलं आणि आखाती देशात जीवन मरणाचा प्रश्न ऐरणीावर आला. या युद्धाचा फटका फक्त दोन देशांनाच नाही तर संपूर्ण जगाला बसला. यात भारत देखील मागे नव्हता. अनेक भारतीय दुबईत अडकून पडले होते. मायदेशी आपल्या नागरिकांना सुखरुप परत आणणं हे भारत सरकारसाठी देखील तितकंच जिगरीचं काम होतं. युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना मायदेशी परत आणण्याने प्रयत्न सुरु होते. आणि मग ही जबाबदारी देण्यात आली ती एका 23 वर्षीय महिला पायलटकडे.

एक अशी जागा जिथे आता आपण श्वास घेतोय पण पुढचा श्वास घेऊ की नाही हे माहित देखील नाही. एक अशी जागा जिथे फक्त रक्ताचे पाट वाहत आहेत एक अशी जागा जिथे गोळीबार आणि बॉम्बब्लास्टचा आवाज कानी येतो. अशा युद्धजन्य ठिकाणातील आपल्या नागरिकांना परत आणण्याचं शिवधनुष्य पेललं ते 23 वर्षाीय महिला पायलट दीपिका अधाना यांनी.

युद्धात अडकलेल्या आपल्या नागरिकांना स्वदेशी परत आणण्यासाठी इंडिया एक्सप्रेसने पाठवलेल्या विशेष विमानाच्या पायलट होत्या दीपिका अधाना. मुळच्या हरियाणाच्या या बेटीने संयुक्त अरब आमिराती मधून एक नाही दोन नाही तब्बल 169 भारतीयांना सुखरुप मायदेशी आणलंच नाही तर त्यांचे प्राण देखील वाचवले. जेव्हा ही जबाबदारी दीपिका यांच्यावर सोपवण्यात आली तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबियांशी संवाद साधला. बोलता बोलता त्या म्हणाल्या देखील आई, मला शेवटचं पाहून घे, कदाचित आजच्यानंतर मी तुला दिसणार नाही. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी देखील दीपिका यांना त्यांच्या कर्तव्यापासून मागे रोखलं नाही तर खांद्यावर दिलेली जबाबदारी लिलया पेलण्यासाठी बळ दिलं.

Incirlik Air Base : तुर्की थरारलं! इराणच्या क्षेपणास्त्रांनी नाटो तळाला केलं टार्गेट; पहा आकाशातील ‘तो’ थरार, VIDEO VIRAL

दीपिका सांगतात की, युद्ध खूपचं पेटलं आणि आपल्या लोकांना मायदेशी परत आणण्यासाठीच्या हालचालींना वेग आला. त्यावेळी अचानक मला संयुक्त अरब अमिरातीमध्ये जाण्याची सूचना मिळाली होती. खरंतर माझ्याऐवजी माझी कलिग मोहीमेवर जाणार होती. मात्र आयत्यावेळी माझ्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली. मी लगेच तयार होऊन मी माझ्या टीमसह निघाले. विशेष म्हणजे या टीममध्ये सगळ्या महिलाच होत्या. त्यात कॅप्टन जसविंदर कौर, वैमानिक दीपिका अधाना आणि इतर चार महिला क्रू सदस्यांचा समावेश होता. या 6 महिलांनी 169 भारतीयांना सुखरुप घरी आणलं.

दुपारी दोन वाजता विमान रास अल खैमाह विमानतळावर सुखरूपरीत्या उतरले. तिथे रोजच्या पेक्षा गर्दी कमी होती. मात्र तिथे कुठलं गडबड आणि गोंधळाचं वातावरण नव्हतं. तासाभराच्या कालावधीत विमानामध्ये 169 प्रवाशांना बसवण्यात आले. त्यानंतर साडे तीन वाजता विमानाने तिथून उड्डाण केले. यादरम्यान, एकदा विमानाचा एटीसीसोबत असलेला संपर्क तुटला. त्यामुळे काही काळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं. मात्र अल्पावधीतच संपर्क प्रस्थापित झाला आणि सुखरूपपणे वाटचाल करत हे विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. केवळ 23 वर्षीय महिला पायलट आणि 5 विमानातील क्रु महिला ज्यांच्यामुळे आज कित्येक कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रु आहेत. भारताच्या या 6 रणरागिणींना नवराष्ट्रचा सलाम.

War Alert: महासत्ता हतबल! इराणने दुबईत शिरून केला धमाका; सायरनच्या आवाजात दडलाय मोठा इशारा, VIDEO VIRAL

Web Title: Deepika adhana pilot she rescue indian citizen in iran istrayal war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • india
  • Isarel Iran War

संबंधित बातम्या

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर
1

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
2

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा
3

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा

AM/NS इंडिया आणि ICAR-IARI च्या संशोधनातून मोठा खुलासा, लोह खनिजाच्या टाकाऊ घटकांपासून सुधारेल जमिनीचे आरोग्य!
4

AM/NS इंडिया आणि ICAR-IARI च्या संशोधनातून मोठा खुलासा, लोह खनिजाच्या टाकाऊ घटकांपासून सुधारेल जमिनीचे आरोग्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.