Defence Minister celebrated India's Rising global stature in Morocco
Defence Minister on Morocco Visit : रबात : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) सध्या दोन दिवसांच्या मोरोक्कोच्या दौऱ्यावर आहेत. भारतीय संरक्षण मंत्री म्हणून हा त्यांच्या पहिला मोरोक्को दौरा आहे. राजनात सिंह मोरोक्कोला टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्सच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या उद्घाटनासाठी गेले आहेत. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताचे आफ्रिकेतील हे पहिले संरक्षण युनिट आहे.
याच वेळी राजनाथ सिंह मोरोक्कोचे संरक्षण मंत्री अब्देलतिफ लौधी यांची भेट घेतली आहे. दोन्ही मंत्र्यांमध्ये द्विपक्षीय संबंधावर चर्चा झाली. यानंतर त्यांनी मोरोक्कोची राजधानी रबातलाही भेट दिली. यावेळी त्यांनी भारतीयांना संबोधित केले.
भारतीयांचा नाद नाही! अमेरिकेच्या H-1B ‘व्हिसा बॉम्ब’ला केला फुसका; शोधला ‘हा’ जुगाडू पर्याय
भारतीयांना संबंधोति करताना राजनाथ सिंह यांनी म्हटले की, ‘भारतीय म्हणून आपली ओळख तुम्ही विसरु नका. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण असतो तरी आप्यात भारतीयपणा ठेवा, हा आपला स्वाभिवक स्वभाव आहे. भारतीय म्हणून जबाबदाऱ्या इतरांपक्षे वेगळ्या आहेत.’ यामुळे आपल्या जबाबदाऱ्या पाळा आणि मोरोक्कोशी निष्ठावान राहा असे आवाहन त्यांनी तेथील भारतीयांना केले. हेच भारताचे खरे यश असेल असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.
याच वेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान (Pakistan News)आणि पीओकेवर (PoK) भारताची ठाम भूमिकाही मांडली. त्यांनी म्हटले की, PoK हा भारताचा भाग असून, एक दिवस तो आपोआप भारतात येईल. तेथील भारतीय समर्थकांनी आवज उठवण्यास सुरुवात केली आहे. तसेच PoK वर ताबा मिळवण्यासाठी भारताला युद्धाची गरज नाही असे त्यांनी सांगितले. तसेच दहशतवादावरही भारताची कठोर भूमिका त्यांना स्पष्ट केले.
पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना उत्तर देताना राजनाथ यांनी स्पष्ट केले की, भारतीय सेना कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सैदव तत्पर आहे. त्यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूर मोहीमेचा उल्लेखही केले. त्यांनी सांगितले की, भारत शेजारी देशाशी चांगले संबंध ठेवू इच्छितो, पण दहशतवादी कारवाया सुरुच राहिल्या तर त्याला योग्य प्रत्युत्तर मिळेल.
#WATCH | Rabat, Morocco: At the interaction with the Indian community in Morocco, Defence Minister Rajnath Singh says, “PoK will be ours on its own. Demands have started being made in PoK, you must have heard sloganeering. I was addressing the Indian Army at a program in Kashmir… pic.twitter.com/IYtk4pSn50
— ANI (@ANI) September 22, 2025
याशिवाय राजनाथ सिंह यांनी भारताच्या वाढत्या सामर्थ्यावरही भर दिला. त्यांनी सांगितले आज भारत आंतरराष्ट्रीय पातळवरील सर्वात महत्त्वपूर्ण देश आहे. २०१४ मध्ये भारताने ५०० स्टार्टअप्स सुरु केले होते, पण आता ही संख्या १.६० लाख वर पोहोचली असल्याचे त्यांनी सांगतिले. राजनाथ सिंह यांनी भारताचया प्रगती, सुरक्षा धोरणे आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेवर प्रकाश टाकला. यामुळे या दौऱ्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मोरोक्कोच्या दौऱ्यावर का गेले आहेत?
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मोरोक्कोच्या दौऱ्यावर भारताच्या आफ्रिकेतील पहिल्या टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्सच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या उद्घाटनासाठी गेले आहेत.
राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान आणि पीओकेला संबोधित करताना काय म्हटले?
राजनाथ सिंह यांनी पीओके एक दिवस भारतात आपोआप येईल असे सांगितले, तसेच त्यांनी पाकिस्तानला कडक संदेश देत त्यांनी दहशतवादी कारवाया न थांबवल्यास योग्य प्रत्युत्तर मिळेल असेही म्हटले.