न लग्न करता एकांतात राहणार मुलं-मुली..; पाकिस्तानी शोचा लाजीरवाणा फॉर्मट? धर्माविरोधात गेल्याने वातावरण तापणार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan ‘Lazawal ishq’ Dating show controversy : इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan) एक नवीन डेटिंग शो सुरु होणार आहे. या डेटिंग शोचे नाव ‘लजवाल इश्क’ असून हा शो २९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मात्र हा शो सुरु होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पाकिस्तानमध्ये लग्नापूर्वी महिला आणि पुरुषांमधील संबंधाना सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या मान्यता नाही. यामुळे या शोवर वाद निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या शोमध्ये चार पुरुष आणि चार महिला इस्तांबूलमध्ये एका विलामध्ये एकत्र राहणार आहे. यावेळ त्यांना काही टास्क दिले जाणार आहेत. यामध्ये जो सर्व टास्क पूर्ण करेल एकमेकांशी मैत्री करले ती जोडी शेवटी विजेती ठरवली जाईल. मात्र यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानमध्ये हा शो गैर-इस्लामिक असल्याचे लोकांनी म्हटले आहे.
यामुळे पाकिस्तानच्या सामाजिक मूल्यांना धोका निर्माण होत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर या शोवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. #BoycottLazawalIshq असा हॅशटॅग वापरला जात आहे. लोकांनी या डेटिंग शोला पाकिस्तान संस्कृतीसाठी आणी इस्लामच्या धार्मिक मुल्यांसाठी धोकादायक ठरवले आहे. लोकांनी, पाप करणे एक गोष्ट आणि त्याला सार्वजनिकपण करणे दुसरी गोष्ट असल्याचे म्हटले आहे.
Pakistan’s first Dating reality show – “Lazawal Ishq” hosted by Ayesha Omar to be aired soon.
Shot in Turkiye. Why not in Pakistan if its for conservative Pakistani society? Audience won’t accept it I guess. pic.twitter.com/XUFU4zqyEL
— Trusfrated Noona (@KontentChingu) September 15, 2025
शोची होस्ट प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमर आहे. आयाशाने सांगितले की, हा शो प्रेम, मैत्री, आणि स्पर्धेचा एक अनोखा एकत्रिकरण आहे. हा शो दर्शकांना भावनिक आणि नाट्यमय स्वरुपात पाहायलामिळेल. तसेच हा शो पाकिस्तानी संस्कृतीनुसार तयार करण्यात आला असल्याचे आयशा उमरने म्हटले आहे. तसेच पाकिस्तानने इलेक्ट्रॉनिक मीडिय रेगुलेटरी अथॉरिटीने (PEMRA) ने सांगितले की, हा शो युट्यूवर प्रसारित होत आहे. यामुळे यावर नियंत्रण ठेवणे शक्य नाही.
काय आहे लजावल इश्क?
लजावल इश्क हा पाकिस्तानमधील एक डेटिंग शो आहे, जो २९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. यामध्ये चार महिला आणि चार पुरुष इस्तंबूलमध्ये एका विलामध्ये एकत्र राहणार आहेत. यावेळी स्पर्धकांना वेगवेळे टास्क दिले जाणार आहे आणि जो सर्व टास्क पूर्ण करेल तो विजेता ठरणार आहे.
शोवर काय वाद निर्माण झाला आहे?
पाकिस्तानमध्ये लग्नापूर्वी मुलामुलींनी एक राहणे हे सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या गैर मानले जाते. यामुळे हा शो गैर-इस्लामिक असल्याचे म्हटले असून या शोला सोशल मीडियावर बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे.