Demand to declare Lawrence Bishnoi Gang a terrorist group in Canada appeal made to PM Mark Carney
Lawrence Bishnoi gang : लॉरेन्स बिश्नोई टोळीचा वाढता प्रभाव आणि गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर, आता कॅनडामध्येही त्यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. विशेषतः अल्बर्टा प्रांतात ही मागणी तीव्र झाली असून, या टोळीला ‘दहशतवादी संघटना’ घोषित करावे, अशी स्पष्ट मागणी स्थानिक नेत्यांनी पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याकडे केली आहे. ही मागणी जर मान्य झाली, तर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीला कॅनडामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल.
अल्बर्टाचे प्रीमियर डॅनियल स्मिथ आणि सार्वजनिक सुरक्षा व आपत्कालीन सेवा मंत्री माइक एलिस यांनी संयुक्तपणे ही मागणी उचलून धरली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळी ही केवळ भारतापुरती मर्यादित नाही, तर ती एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क आहे. या टोळीने कॅनडामध्येही आपले जाळं पसरवले असून, तेथे खंडणी, हिंसाचार, ड्रग्ज तस्करी आणि टार्गेट किलिंगसारख्या गंभीर गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 8 वर्षांची तपश्चर्या! रशियाची ‘ती’ रहस्यमय साध्वी, गोकर्ण जंगलात गुहा, गुहेत रुद्र मूर्ती; वाचा ‘ही’ गूढ रंजक कहाणी
डॅनियल स्मिथ यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (Twitter) खात्यावरून एक पोस्ट शेअर करत लॉरेन्स टोळीला थेट इशारा दिला. त्यांनी म्हटले आहे, “लॉरेन्स बिश्नोई टोळी ही हिंसेचे, खंडणीचे आणि अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क आहे. कॅनडामध्ये अशा गुन्हेगारी टोळ्यांना जागा नाही.” ते पुढे म्हणाले, “अशा टोळ्यांना सीमा माहित नसतात, ना त्या सीमेचा आदर करतात. मात्र अल्बर्टा त्यांना स्पष्ट संदेश देत आहे तुम्हाला येथे स्थान नाही. कॅनडाच्या सुरक्षेसाठी तातडीची कारवाई आवश्यक आहे.”
The Lawrence Bishnoi Gang is a transnational criminal network responsible for violence, extortion, drug trafficking and targeted killings, including here in Canada. Its reach is global, and its intent is criminal and violent. We know that gang activity knows no boundaries and… pic.twitter.com/wYwdAx3pfT — Danielle Smith (@ABDanielleSmith) July 15, 2025
credit : social media
स्मिथ आणि एलिस यांनी पंतप्रधान मार्क कार्नी यांना विशेष निवेदन सादर केले असून, त्यामध्ये लॉरेन्स टोळीला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांचे म्हणणे आहे की ही टोळी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध कडक कायदेशीर पावले उचलणे ही काळाची गरज आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही केवळ भारतापुरती सीमित नाही. पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि महाराष्ट्रात या टोळीच्या नावावर अनेक खून, खंडणीप्रकरणं, गँगवार्स आणि ड्रग्ज तस्करीच्या केस आहेत. सिद्धू मूसेवाला याच्या हत्येसाठीही ही टोळी जबाबदार आहे, असे भारतातले तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.
कॅनडामध्ये भारतीय गँग्सचा वाढता प्रभाव ही गंभीर चिंता बनली आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारी संघटनांविरुद्ध कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. जर लॉरेन्स टोळीला दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले, तर कॅनडामधील त्यांचे आर्थिक स्रोत, सोशल नेटवर्किंग, सहकारी आणि गुन्हेगारी घडामोडींवर मोठा आघात बसेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जमीन, समुद्र आणि आकाशातही भारताची गरुडझेप; ‘Talisman Saber 2025’ने पाकिस्तानची चिंता वाढवली
लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध कॅनडामधून उठलेली ही मागणी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेत आहे. पंतप्रधान कार्नी यांची भूमिका आता निर्णायक ठरणार आहे. भारतात या टोळीला आधीच ‘मोस्ट वॉन्टेड’ म्हणून पाहिले जाते. जर कॅनडानेही तशी पावले उचलली, तर ही टोळी आंतरराष्ट्रीय स्तरावर अलग ठेवली जाईल, आणि तिच्यावर आणखी कडक कारवाईस प्रारंभ होईल.