काय आहे Donroe Doctrine? व्हेनेझुएलानंतर ट्रम्पने 'या' देशांना दिली सरकार उलथवून टाकण्याची धमकी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Maduro Arrest : पाच दिवस आधीच इशारा? मादुरो अटकेनंतर पेरुच्या तांत्रिकांची भविष्यवाणी चर्चेत
डोनाल्ड ट्रम्प यांनी १८२३ चे मोनेरो डॉक्ट्रिन धोरणामध्ये बदल केला आहे. यामध्ये अत्याधुनिक आणि आक्रमक असे बदल करण्यात आले असून हे धोरण अमेरिकेच्या पश्चिम गोलार्धातील वर्चस्वासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प या धोरणातून रशिया आणि चीनचे शेजारील देशांमधून वर्चस्व मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुलळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण झाला आहे. मानवी हक्क आणि राष्ट्रीय सार्वभौमत्त्वावर ट्रम्प आघात करत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
डोनरो डॉक्ट्रिन ही अमेरिकेची नवी परराष्ट्र निती आहे. याअंतर्त अमेरिका पश्चिम गोलार्धात पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करणार आहे. अमेरिका येथून चीन आणि रशियाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला या भागातील कोणत्याही देशाकडून धोका निर्माण झाल्यास त्यांचावर लष्करी कारवाई करण्यात येईल आणि त्या देशाचे सरकार उलथवून टाकले जाईल.
दरम्यान हे नवे परराष्ट्र धोरण जाहीर केल्यानंतर ट्रम्प यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलानंतर धोरणात्मकदृष्ट्या ग्रीनलँडवर आणि क्युबावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या ग्रीनलँड हे डेन्मार्कच्या नियंत्रणाखाली असून यावर ट्रम्प यांना वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प आर्क्टिक प्रदेशातील रशियाच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला आव्हान देत आहे. तर ट्रम्प यांनी क्युबाला देखील त्यांचे सरकार कोसळणार असल्याचे संकेत दिले आहे.
यानंतर कोलंबियाला लक्ष केले जाईल असेही संकेत ट्रम्पकडून मिळाले आहेत. ट्रम्प यांनी कोलंबियाला धमकी दिली आहे. त्यांना व्हेनेझुएलासारखी परिस्थिती बघावी लागेल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प पश्चिम गोलार्धात प्रतिस्पर्धी देशांचा प्रभाव रोखत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान अमेरिकेच्या या परराष्ट्र धोरणाला जागतिक स्तरावर विरोध केला जात आहे. ही जागतिक राजकारणातील सत्तेसाठी मोठी खेळी असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांच्या या नव्या धोरणामुळे इतर देशांच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत असून यामुळे त्यांचे सार्वभौमत्वही संकटात आले असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे लोकशाही आणि मानवी हक्कांवर आघात होत असल्याची टीका केली जात आहे.
Venezuela त होणार निवडणुका? Maduro च्या कोर्टात सुनावणीनंतर ट्रम्प यांची मोठी घोषणा
Ans: Donroe Doctrine हे अमेरिकेचे नवे परराष्ट्र धोरण आहे. याअंतर्गत अमेरिका पश्चिम गोलार्धात आपले वर्चस्व प्रस्थापित करुन चीन आणि रशियाचा प्रभाव नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Ans: ट्रम्प यांनी व्हेनेझुएलानंतर क्यूबा, ग्रीनलँड, आणि कोलंबियाला लक्ष केले आहे.
Ans: ट्रम्प यांच्या नवे धोरण हे देशांच्या सार्वभौमत्वावर आणि मानवी हक्कांवर आघात करणारे असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हटले जात आहे.






