Difference Between Green Card and Gold Card
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांनी मंळवारी (25 फेब्रुवारी) अमेरिकन नागरित्वसाठी एक नवीन मार्ग खुला केला. ट्रम्प यांनी अमेरिका ‘गोल्ड कार्ड’ सुरु करणार असल्याची घोषणा केली. याद्वारे श्रीमंत विदेश गुणंतवणूक दारांना 5 दशलक्ष डॉलर्सच्या मोबदल्यात अमेरिकन नागरिकत्व मिळू शकते. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळफास 43 कोटी रुपयांची गुंतवणूक लोकांना करावी लागले. यामुळे अमेरिकेत नोकऱ्यांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील असे ट्रम्प यांचे मत आहे.
मात्र, थेट पैसे खर्च करुन अमेरिकन नागरिकत्व मिळमार नाही, तर भविष्यात यासाठी तुम्ही अर्ज करु शकता. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा उद्देश देशात श्रीमंत गुंणतवणूक दारांना आकर्षित करणे आणि देशात स्थिरता निर्माण करणे आहे.
काय आहे गोल्ड कार्ड?
गोल्ड कार्ड ही नवीन पद्धत EB-5 या इमिग्रेट इन्व्हेस्ट व्हिसा प्रोगग्रामची जागा घेणार आहे. EB-5 व्हिसाचा उद्देश अमेरिकेत मोठी गुंतवणुक करुन रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे. या व्हिसासाठी 1 कोटी डॉलर्सची गुंतवणूक यापूर्वी केली जात होती. मात्र, आता ट्रम्प प्रशासनाच्या मते, ही रक्कम कमी असल्याने वाढववण्यात आली आहे. यामुळे EB-5 व्हिसा प्रोग्राम रद्द करुन त्याच्या जागी गोल्ड कार्ड सुरु करण्यात येणार आहे.
गोल्ड कार्ड ग्रीन कार्डपेक्षा किती वेगळे
गोल्ड कार्ड आणि EB-5 व्हिसा गुंणतवणूक दारांच्या दृष्टीकोनातून ग्रीन कार्डसारखेच आहे. याद्वारे अमेरिकेत राहण्याची आणि काम करण्याची संधी हे कार्ड प्रदान करते. ग्रीन कार्ड एक कायमस्वरुपी रेसिडेंट कार्ड असून अमेरिकेत राहण्यासा आणि काम करण्यास अधिकृतता प्रदान करते.
ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी, कुटूंबातील सदस्य अमेरिकन असणे, नोकरीच्या संधी, आणि विशेष कौशल्यांची आवश्यकता आहे. पण गोल्ड कार्ड याविरुद्ध आहे, यासाठी तुम्हाल फक्त 5 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक गरजेचे आहे.
कार्डचे अधिकार
कोणत्याही व्यक्तीला गोल्ड कार्ड किंवा ग्रीन कार्ड मिळाल्यावर तुम्ही थेट अमेरिकेचे नागरिक बनत नाही. मात्र, हे कार्ड धारक भविष्यात नागरिकत्वासाठी अर्ज करु शकतात. ग्रीन कार्डमुळे सर्व सुविधा मिळतात, मात्र काही अमेरिकन नागरिकांपेक्षा अधिकार कमी असतात.
अमेरिकन नागरिकांना मतदानाचा अधिकार असतो, हवे तितके दिवस देशातून बाहेर राहण्याची मुभा असते. तसेच परदेशी नातेवाईकांसाठी अमेरिकेत राण्याची याचिका दाखल करता येते. सैन्यात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेश मिळतो. मात्र, ग्रीन कार्ड किंवा गोल्ड कार्ड असलेल्या व्यक्तींना हे अधिकार मिळत नाहीत.