Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump: अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातून आयात होणाऱ्या कार, ट्रक, ऑटोमोबाईल पार्ट्स आणि स्टीलवरील टॅरिफ 1 जानेवारी 2027 पासून 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. कॅनडा अनेक वर्षांपासून व्यापारात अमेरिकेचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 25, 2026 | 02:00 PM
अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी

अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा कॅनडाला मोठा दणका!
  • कार, ऑटो पार्ट्स आणि स्टीलवर 50 टक्के टॅरिफची घोषणा
  • ट्रम्प आक्रमक, 50 टक्के टॅरिफचा इशारा
 

Donald Trump : अमेरिका आणि कॅनडामधील व्यापार तणाव आणखी वाढण्याची चिन्हे दिसून येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातून येणाऱ्या कार, ट्रक, ऑटोमोबाईल पार्ट्स आणि स्टीलवर 1 जानेवारी 2027 पासून 50 टक्के टॅरिफ लागू करण्याची धमकी देण्यात आली आहे. या दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ट्रम्प यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे. परिणामी ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे व्यापार तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांची Truth Social वर घोषणा

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या Truth Social या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत कॅनडावर जोरदार टीका केली. कॅनडा अनेक वर्षांपासून व्यापाराच्या माध्यमातून अमेरिकेचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. अमेरिकेतील शेतकरी आणि कृषी उत्पादनांवर कॅनडाकडून आकारण्यात येणाऱ्या उच्च टॅरिफचाही ट्रम्प यांनी उल्लेख केला. कॅनडाच्या धोरणांमुळे अमेरिकन शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा; म्हणाले, ‘होर्मुझवर आमचं संपूर्ण नियंत्रण…’

1 जानेवारी 2027 पासून 50 टक्के टॅरिफ?

ट्रम्प यांच्या घोषणेनुसार, 1 जानेवारी 2027 पासून कॅनडातून अमेरिकेत येणाऱ्या सर्व कार, मोठे आणि छोटे ट्रक, ऑटोमोटिव्ह पार्ट्स आणि स्टीलवरील टॅरिफ 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येईल. अमेरिकेतच वस्तूंचे उत्पादन करा आणि शून्य टॅरिफचा लाभ घ्या, असा संदेशही ट्रम्प यांनी उद्योगांना दिला आहे.

“कॅनडाला अमेरिकेची जास्त गरज”

ट्रम्प यांनी कॅनडावर गंभीर आरोप करत व्यापाराच्या दृष्टीने व्यवहार करण्यासाठी तो जगातील कठीण देशांपैकी एक असल्याचे म्हटले. कॅनडाची अर्थव्यवस्था अमेरिकन बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याचा दावाही त्यांनी केला. कॅनडाला अमेरिकेची जितकी गरज आहे, तितकी अमेरिकेला कॅनडाची नाही, अशी आक्रमक भूमिकाही ट्रम्प यांनी मांडली.

व्यापार चर्चेनंतर वाढला तणाव

अमेरिका आणि कॅनडा हे दीर्घकाळापासून महत्त्वाचे व्यापारी भागीदार आहेत. विशेषतः वाहन उद्योगामध्ये दोन्ही देशांची पुरवठा साखळी एकमेकांशी जवळून जोडलेली आहे. मात्र, व्यापार धोरण आणि टॅरिफच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. अलीकडील व्यापार चर्चा निष्फळ ठरल्यानंतर कॅनडातील काही वस्तूंवरील अमेरिकेचे नियोजित टॅरिफ लागू झाले. त्यानंतर कॅनडानेही प्रत्युत्तरात्मक पावले उचलण्याचा इशारा दिल्याने व्यापार संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वाहन उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

अमेरिका आणि कॅनडातील वाहन उद्योग एकमेकांशी मोठ्या प्रमाणावर जोडलेला आहे. वाहनांचे विविध भाग उत्पादन प्रक्रियेदरम्यान अनेकदा अमेरिका-कॅनडा सीमा ओलांडतात. त्यामुळे 50 टक्के टॅरिफ प्रत्यक्षात लागू झाल्यास वाहन उत्पादकांच्या खर्चावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ऑटो पार्ट्स आणि स्टीलवरील वाढीव शुल्कामुळे वाहन उत्पादन खर्च वाढण्याची तसेच त्याचा परिणाम पुढे ग्राहकांना मोजाव्या लागणाऱ्या किमतींवर होण्याची शक्यता आहे.

अमेरिका-कॅनडा संबंधांमध्ये आणखी कटुता?

ट्रम्प यांनी यापूर्वीही कॅनडाच्या व्यापार धोरणांवर सातत्याने टीका केली आहे. आता थेट 50 टक्के टॅरिफची धमकी दिल्यामुळे वॉशिंग्टन आणि ओटावा यांच्यातील व्यापार संबंध आणखी तणावपूर्ण होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः वाहन, ऑटो पार्ट्स आणि स्टील उद्योगांसाठी पुढील काही महिने महत्त्वाचे ठरणार आहेत. 1 जानेवारी 2027 पासून प्रस्तावित 50 टक्के टॅरिफ प्रत्यक्षात लागू झाल्यास अमेरिका-कॅनडा व्यापार संघर्षाला आणखी मोठे वळण मिळू शकते.

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा

Web Title: Donald trump announces 50 percent tariff on canada cars auto parts steel from january 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Canada
  • Donald Trump
  • Tariff

संबंधित बातम्या

US-Iran War: पेट्रोलच्या किमती आणि निवडणुकांचे गणित; ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा निर्णय बदलला? ‘अशा’ एका पोस्टमुळे खळबळ
1

US-Iran War: पेट्रोलच्या किमती आणि निवडणुकांचे गणित; ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा निर्णय बदलला? ‘अशा’ एका पोस्टमुळे खळबळ

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
2

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Marco Rubio: ‘ट्रम्प इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत’; मार्को रुबियो यांनी आखली ‘लक्ष्मणरेषा’, क्षेपणास्त्रे-ड्रोनवरही मोठे विधान
3

Marco Rubio: ‘ट्रम्प इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत’; मार्को रुबियो यांनी आखली ‘लक्ष्मणरेषा’, क्षेपणास्त्रे-ड्रोनवरही मोठे विधान

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार
4

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.