Donald Trump makes allegations on Biden says he Meddled in Indian Elections
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय बनत आहेत. काही दिवासांपूर्वीच त्यांनी भारताला USAID अंतर्गत मिळणारी फडिंग रद्द केली होती. त्यांच्या या निर्णयाने भारतीय राजकारणात गोंधळ निर्माण झाला. याच दरम्यान ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर भारतीय निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडवली आहे.
ट्रम्प यांनी म्हटले आहे की, बायडेन भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींव्यतिरिक्त दुसऱ्या कोणालातरी निवडून आणू इच्छित होते. यासाठी 182 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचा ट्रम्प यांनी दावा केला. त्यांनी याबाबत भारत सरकारला कळवणार असल्याचेही जाहीर केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्त्रायल साखळी बॉम्बस्फोटांनी हादरला; तीन बसेसमध्ये मोठा स्फोट
ट्रम्प मियामी येथील सौदी अरेबिया सरकारच्या फ्यूचर इन्वेस्टमेंट इनिशिएटिव्ह (FII) समिटमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी, युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) कडून भारताला मतदार जागरूकता मोहिमेसाठी हा निधी देण्यात आला असल्याचे सांगितले.
अमेरिका ते भारत पैसा कसा आला?
भारताला USAID कडून 4000 कोटी रुपये आंतरराष्ट्रीय निधीचा भाग म्हणून देण्यात आला होता. हा निधी कन्सोर्टियम फॉर इलेक्शन अँड पॉलिटिकल प्रोसेस स्ट्रेंथनिंग (CEPPS) या संस्थेला देण्यात आला, यात IFES, NDI आणि IRI या तीन NGO चा समावेश होता. या संस्थांनी एशियन नेटवर्क फॉर फ्री इलेक्शन (ANFREL) या NGO ला निधी दिला आणि नंतर भारतातील IFES ला तो निधी प्राप्त झाला.
निधी कसा वापरला गेला?
मतदार जागरुकतेसाठी काम करणाऱ्या NGO, सिव्हिल सोसायटी समूह आणि काही राजकीय पक्षांना हा निधी देण्यात आला. रॅली, डोर-टू-डोर कॅम्पेन, कार्यशाळा आणि काही भांगात मतदान वाढवण्यासाठी हा निधी वापरण्यात आला. तसेच माध्यमांद्वारे केंद्र सरकारविरोधी प्रचार, वॉलंटिअर्सचे प्रशिक्षण आणि त्यांच्या राहण्याच्या व प्रवास खर्चासाठीही हा निधी वापरला गेला.
राजकीय प्रतिक्रिया
दरम्यान ट्रम्प यांच्या आरोपांना कॉंग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी बिनबुडाचे म्हटले आहे. त्यांनी केंद्र सरकारने USAID कडून भारतातील सर्व सरकारी व बिगर सरकारी संस्थांना मिळालेल्या मदतीवर श्वेतपत्र प्रसिद्ध करावे, अशी मागणी केली. तर भाजपाच्या IT सेल प्रमुख अमित मालवीय यांनी, पंतप्रधान मोदी यांनी पूर्वीच विदेशी हस्तक्षेपाबाबत इशारा दिला होता असे म्हटले. त्यांनी राहुल गांधींवर अमेरिका आणि ब्रिटनमध्ये भारतविरोधी प्रचार केल्याचा आरोप केला.