ट्रम्पचा जयजयकार! व्हाईट हाउसला राष्ट्राध्यक्षांचा राजासारखा फोटो शेअर करणं पडलं महागांत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल (फोटो सौजन्य: एक्स @WhiteHouse)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत चालले आहेत. अध्यक्ष पदाच्या चार आठवड्यातच ट्रम्प यांनी आपल्या निर्णयांनी जगाला हादरुन टाकले आहे. सध्या ट्रम्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. व्हाईट हाउसने त्यांच्या अधिकृत एक्स हॅंडलवर एक वादग्रस्त पोस्टर शेअर केला असून या पोस्टरला टीकेचा सामना करावा लागत आहे.
व्हाईट हाऊसने या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये जय हो राज असे लिहिले आहे. तसेच या पोस्टवर टाईम मॅगझिनच्या मुखपृष्ठावरील एक नमुना देखील दिसत आहे. यामध्ये ट्रम्प यांनी मुकूट परिधान केलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष होऊन फक्त एक महिना झाला असून व्हाइट हाउसने हा पोस्टर शेअर केला आहे. यामुळे यावर तीव्र टीका केली जात आहे.
“CONGESTION PRICING IS DEAD. Manhattan, and all of New York, is SAVED. LONG LIVE THE KING!”
–President Donald J. Trump pic.twitter.com/IMr4tq0sMB— The White House (@WhiteHouse) February 19, 2025
एक्सवरील या पोस्टवर “कंजेसन प्राइसिंग संपले आहे. मनहॅटन आणि संपूर्ण न्यूयॉर्क वाचले आहे. राजाला नमस्कार!” असे लिहिले आहे.(CONGESTION PRICING IS DEAD. Manhattan, and all of New York, is SAVED. LONG LIVE THE KING!” – President Donald J. Trump)
यापूर्वीही ट्रम्प वादाच्या भोवऱ्यात
ट्रम्प वादाच्या भोवऱ्यात सापलडेल असून यापूर्वी अनेक वेळा त्यांच्या निर्णयांवरुन मोठा वाद झाल होता. यापूर्वी व्हाइट हाऊसने एक्सवर ASMR चा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार केले जात होते. अवैध प्रवाशांना साखदंड बांधण्यात आले असल्याचे व्हिडिओत दिसत होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ट्रम्प यांना अनेकांचा विरोध सहन करावा लागला होता.
सोशल मीडियावरील प्रतिक्रीया
सध्या सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या या पोस्टरवर जोरदार टिका केली जात आहे. एका युजरने म्हटले आहे की, ‘त्यांना त्यांच्या बाथरुमसाठी पोस्टर्सटी गरज आहे का?, तर दुसऱ्या एकाने अशा पोस्ट आपल्या देशासाठी लज्जास्पद आणि अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे.
आणखी एका युजरने, ‘ कोणत्याही रिपब्लिकनने क्षणभर वि विचार करावा की जर ओबामा आणि जो बायडेन यांनी अशी पोस्ट शेअर केली असती तर काय झाले असते.” या लोकांनी आग लावली असती.” अशा अनेक टीकांचा सामना सध्या ट्रम्प यांना करावा लागत आहे.