Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आणखी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची ट्रम्प प्रशासनात एन्ट्री; ‘या’ पदासाठी करण्यात आली नियुक्ती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात आणखी एका भारतीय वंशांच्या व्यक्तीची प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. हॅरी कुमार यांची ट्रम्प प्रशासनात वाणिज्य विभागात असिस्टंट सेक्रेटरी पदासाठी निवड केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 23, 2025 | 11:54 AM
Donald Trump nominates Harry Kumar as Assistant Secretary of Commerce

Donald Trump nominates Harry Kumar as Assistant Secretary of Commerce

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात आणखी एका भारतीय वंशांच्या व्यक्तीची प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वंशाचे हॅरी कुमार यांची ट्रम्प प्रशासनात वाणिज्य विभागात (Department of Commerce) असिस्टंट सेक्रेटरी पदासाठी निवड केली आहे. अमेरिकन कॉंग्रेसच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, 10 मार्च 2025 रोजी त्यांचे नामांकन करण्यात आले होते.

अमेरिकेच्या वाणिज्य विभागात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास मदत

हॅरी कुमार वाणिज्य विभागाच्या असिस्टंट  सेक्रेटरी कुमार सुझी फेलिझ यांची जागा घेणार आहेत. अमेरिकेच्या आर्थिक धोरण, व्यापारतील करार आणि व्यावसायिक विकासाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अमेरिकेच्या वाणिज्य विभागाला मदत करतील. सध्या हॅरी कुमार अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांच्या कार्यलयात वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. सल्लागार म्हणून ते आर्थिक धोरण, व्यापार करार आणि व्यवसाय विकासाला चालना देण्याशी संबंधित महत्त्वाच्या बाबींवर धोरणात्मक सल्ला देतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बलुच बडखोरांच्या हल्ल्यानं पाकिस्तान पुन्हा हादरला; सुरक्षा दलांवरील हल्ल्यात चार सैनिक ठार

कोण आहेत हॅरी कुमार?

मीडिया रिपोर्टनुसार, हॅरी कुमार टेक्साच्या ब्यूमोंट शहरात त्यांचा जन्म झाले असून तेथील रहिवासी आहेत. त्यांचे पालक डॉ. नॅट आणि डॉ. सकू कुमार नेहमीच हॅरी कुमार यांच्या शिक्षणाला प्राधन्य दिले आहे. हॅरी कुमार यांचे शिक्षण टेक्सासच्या ए अँड एम विद्यापीठातून झाले आहे. या विद्यापीठातून त्यांनी राजशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी टेक्सास टेक विद्यापीठ स्कूल ऑफ लॉमधून कायद्याची पदवी घेतली.

राजकीय आणि प्रशासकीय अनुभव

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हॅरी कुमार यांनी कॅपिटल हिलमधून अमेरिकन प्रतिनिधी रँडी वेबर यांच्यासाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले. येथून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर हॅरी यांनी वॉशिंग्टन डी. सी येथे अमेरिकन सिनेटर मार्को रुबियो यांचे धोरण सल्लागार म्हणून काम केले. सिनेटमधील कार्याव्यतिरिक्त हॅरी यांनी  ली-सायकल(Le- Cycle) या कंपनीमध्ये सरकारी सहाय्यक संचालक म्हणून कामकाज पाहिले.

सिनेट समिती नामांकनाचा आढावा

सध्या अमेरिकन सीनेटच्या वाणिज्य, विज्ञान आणि वाहतूक विषयक समिती त्यांच्या नामांकनाचा आढावा घेत आहे. हॅरी कुमार यांचे नाव सीनेटच्या कार्यकारी कॅलेंडरमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, परंतु अंतिम मंजुरी मिळालेली नाही. हॅरी कुमार यांच्या कामाचा क्रयभार निश्चित झाल्यावर, अमेरिकेच्या व्यापर धोरण, आर्थिक धोरण आणि आर्थिक सुधारणा आणि व्यावसायिक संंधींवर त्यांच्या मोठ्या प्रभाव राही. भारतीय वंशांच्या आणखी एका व्यक्तीसाठी ही मोठी संधी म्हटली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारतासाठी आनंदाची बातमी! तेजस फायटर जेटच्या इंजिनची डिलिव्हरी ‘या’ महिन्याच्या अखेरीस होणार

Web Title: Donald trump nominates harry kumar as assistant secretary of commerce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

एपस्टाईन प्रकरणावरुन ट्रम्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; जेफ्रीशी जवळचा संबंध असल्याचा दावा, अमेरिकेच्या राजकारणात खळबळ
1

एपस्टाईन प्रकरणावरुन ट्रम्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; जेफ्रीशी जवळचा संबंध असल्याचा दावा, अमेरिकेच्या राजकारणात खळबळ

Russia Ukraine War : तुर्कीच्या मध्यस्थीने होणार युक्रेन युद्धबंदी? जे ट्रम्प करु शकले नाहीत, एर्दोगान यांना जमेल का?
2

Russia Ukraine War : तुर्कीच्या मध्यस्थीने होणार युक्रेन युद्धबंदी? जे ट्रम्प करु शकले नाहीत, एर्दोगान यांना जमेल का?

UK Political Crisis : ब्रिटनमध्ये सत्तापालटाची चिन्हे! पंतप्रधान केयर स्टारमर यांना हटवण्याचा कट?
3

UK Political Crisis : ब्रिटनमध्ये सत्तापालटाची चिन्हे! पंतप्रधान केयर स्टारमर यांना हटवण्याचा कट?

एस. जयशंकर यांनी घेतली मार्को रुबियो यांची भेट; दिल्ली बॉम्बस्फोटावर दोन्ही मंत्र्यांमध्ये झाली चर्चा, जाणून घ्या
4

एस. जयशंकर यांनी घेतली मार्को रुबियो यांची भेट; दिल्ली बॉम्बस्फोटावर दोन्ही मंत्र्यांमध्ये झाली चर्चा, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.