
Britain PM Keir Starmer
UK Political Crisis : लंडन : ब्रिनच्या (Britain) राजकारणामध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर (Keir Starmer) यांना सत्तेवरुन हटवण्याचा कट रचला जात असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या लेबर पक्षातील रोष वाढला आहे. समर्थकांनी त्यांच्याविरोधात बंड पुकारला आहे. यामुळे सध्या स्टारमर चिंतेत आहेत.
द गार्डियन वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या पंतप्रधान स्टारमर अंतर्गत राजकारणात अडकले असून यावर तोडगा काढण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे. अहवालानुसार, स्टारमर याच्या लेबर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सत्तेवरुन हटवण्याचा कट रचल्याच्या अफवा पसरत आहेत.
सुत्रानुसार, आरोग्य सचिव वेस स्ट्रीटिंग यांनी हा डाव खेळला असून सध्या त्यांच्यासोबत ५० खासदार स्टारमर विरोधात उभे आहेत. यामुळे स्टारमर यांची खुर्ची धोक्यात आली आहे. पण, वेस स्ट्रीटिंग ना या अहवालातील आरोपांना फेटाळून लावले आहे. या अहवालाला त्यांनी त्यांना पराभूत करण्यासाठीचा मूर्खपणा असे म्हटले आहे.
अहवालानुसार, या महिन्यात ब्रिटनचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. तसेच मे २०२६ मध्ये स्थानिक निवडणुका होणार आहेत. यावेळी एखादा मोठा डाव खेळला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पंतप्रधान स्टारमर सरकारी कर्ज कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी कर वाढ आणि सरकारी खर्चात कपात होण्याची शक्यात आहे. तसेच त्यांच्या नवीन स्थलांतरविरोधी धोरणावरही सध्या चर्चा सुरु आहे. यामुद्यांवरुन स्टारमर यांना खाली पाडण्याचा प्रयत्न होऊ शकतो असे म्हटले जात आहे.
सध्या पक्षातील ५०% लोक वेस स्ट्रींटिगच्या बाजूने उभे आहेत. शिवाय ७३% टक्के ब्रिटनची जनता स्टारमर यांना नापसंत करते. यामुळे कोणताही डाव खेळला गेला तर स्टारमर यांच्या हातातून पंतप्रधान पद जाण्याची शक्यता आहे.
स्टारम यांच्या लोकप्रियतेत सतत घटन होत आहे. अनेक सर्वेक्षणांवरुन स्टारमर ब्रिटनच्या इतिहासातील आतापर्यंत सर्वात नापसंत केले जाणारे पंतप्रधान आहेत. शिवाय स्टारमर देशातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यास, महागाई कमी करण्यात अयशस्वी ठरले आहेत. तसेच देशातील स्ठलांतरितांची संख्या वाढत आहे. यामुळे स्टरमर यांच्या इमिग्रेशन धोरणांना तीव्र विरोध होत आहे, यामुळे पंतप्रधान स्टामर यांच्या लोकप्रियतेत घट होत आहे.
भारत ब्रिटनसोबत करणार मुक्त व्यापार करार, काय आहे करार आणि देशाला कसा होईल फायदा? सविस्तर जाणून घ्या
Ans: सध्या ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांना सत्तेतून हटवण्याचा प्रयत्न सुरु आहे, विशेष म्हणजे त्यांच्याच लेबर पक्षातील लोकांना हा कट रचला आहे. यामुळे ब्रिटनच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाला आहे.
Ans: स्टारमर यांच्या लेबर पक्षातील आरोग्य सचिव वेस स्ट्रीटिंग यांनी पंतप्रधानांना हटवण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Ans: वेस स्ट्रीटिंग यांनी त्यांच्यावर स्टारमर यांना हटवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांना फेटाळले आहे. याला त्यांनी मूर्खपणा म्हटले आहे.