Donald Trump says he's considering ways to serve third term as President
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अमेरिकन संविधानानुसार, कोणतीही व्यक्ती दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होउ शकते, मात्र तिसऱ्या कार्यकाळासाठी ट्रम्प यांनी मार्ग शोधल्याचा दावा केला आहे. NBC वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी, तिसऱ्या कार्यकाळासाठी विचार करत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.
यासाठी ट्रम्प यांनी मुलाखतीदरम्यान म्हटले की, संविधानात बदलण्याच्या शक्यांताचा अभ्यास करत असल्याचेही त्यांनी मुलाखतीत सांगितले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, संविधानात काही अशा तरतुदी आहे, यामुळे त्यांना तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळू शकते. याबाबत ते गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड् ट्रम्प यांना यासाठी कोणते मार्ग आहेत विचारले गेल्यानंतर त्यांनी सांगितले की, असे अनेक मार्ग आहेत. यापैकी एक म्हणजे जेडी वेंस यांना निवडणुकीसाठी उभे करणे आणि ते जिंकल्यानंतर ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपद सोपवणे. याशिवायही अनेक मार्ग असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. यामध्ये त्यानी संविधानात सुधारणा करणे महत्वाचा मार्ग असल्याचे सांगितले.
अमेरिकेत कोणत्याही व्यक्तीला दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर राष्ट्राध्यक्ष होण्यास मनाई आहे. यामुळे ट्रम्प यांनी तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाचा विचार केला तर यासाठी त्यांना संविधानात सुरधारणा करमे आवश्यक आहे. तसेच त्यांना यासाठी अमेरिकन कॉंग्रेस आणि विविध राज्यांचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संविधानात सुधारणा करण्यासाठी, अमेरिकेन सीनेट प्रतिनिधी सभेत दोन तृतीयांश बहुमताने विधायक मंजूर व्हावे लागले. सध्या ट्रम्प यांचा कार्यकाळ 2029 मध्ये संपेल. 2024 च्या निवडणुकीत ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला आणि राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. यामुळे2029 नंतरही पदावर राहण्यासाठी ट्रम्प विविध मार्ग शोधत आहेत.
डोनाल्ड ट्रपम्प यांनी अनेक वेळा तिसऱ्यादा राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 2024 मध्ये ट्रम्प यांनी निवडणूक जिकल्यानतर आणि जानेवारीत पदाची शपथ घेतल्यानंतरही आपल्या इच्छेचा उल्लेख केला होता. ट्रम्प याच्या रिपब्लिकन पक्षाचे खासदार अँडी ओगल्स यांनी संसदेत यासाठी एक विधेयक सादर केले आहे.
या विधेयकात नमूद करण्यात आले आहे की,एक व्यक्ती दोन वेळा राष्ट्राध्यपदी नियुगक्त झाली असेल, तर तिसऱ्यांदा निवडणूक लढवू शकत नाही. मात्र, ट्रम्प यांनी 2022 मध्ये बायडेन यांच्याकडून मिळालेला पराभूत मान्य नसून , त्यांच्यावर हा नियम लागू होत नाही. यामुळे ट्रम्प यांना तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.