
Iran Coup Threat
Iran Protest : इराणमध्ये Gen Z आंदोलन उफाळलं; सुरक्षा दलाच्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू
नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक विधान जारी केले होते. या इशाऱ्यानंतर धोक्याची परिस्थिती पाहता इराणने देशात सत्तापालट रोखण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी इराणचे सर्वोच्च नेते अली-खामेनी यांनी दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतेल आहेत.
द टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इराणमध्ये सध्या तरुणांचे वाढत्या महागाईविरोधात तीव्र आंदोलन सुरु आहे. याच वेळी व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर इराणवर हल्ल्याचे संकेत अमेरिकेकडून मिळाले आहे. दरम्यान इराणमध्ये २७ डिसेंबर २०२५ पासून महागाईवरुन तीव्र आंदोलन सुरु आहे. आंदोलन कर्त्यांच्या मते, सरकारने वाढत्या महागाईकडे दुर्लक्ष करत आहे. त्यावर कोणतचाही तोडगा काढण्यासाठी चर्चा केली जात नाही, कोणती महत्त्वपूर्ण पाऊलले उचलली जात नाहीत.
इराणचे चल रियाल हे अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक घरसले आहे. दरम्यान या निदर्शनाद्वारे अमेरिका इराणमध्ये हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. यामध्ये आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय ट्रम्प यांनी अलीकडेच इशारा दिला होता की, शांततापूर्ण आंदोलकांवर गोळीबार झाल्यास अमेरिका गप्प बसणार नाही. अमेरिका इराणवर कठोर निर्बंध लादेल.
याच पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते खामेनी रशियामध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. खामेनींची संपूर्ण सत्ता इराणमध्ये आहे. संरक्षण आणि न्यायाशी संबंधित सर्व प्रमुख निर्णय हे खामेनींच्या हातात असतात. तर दुसरीकडे निदर्शने संपवण्यासाठी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सरकारी अनुदानात तिप्प्टीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार महागाई कमी करण्यासाठी प्रयत्नशील झाला आहे.
अर्थ मंत्रालयात आणि त्या संबंधित विबागांमध्ये काही बदल करुन इराण आपल्या लोकांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. गुप्तचर माहितीनूसार, इराण आतापर्यंत निदर्शकांवर थेट हल्ला करत होता. परंतु आता लक्ष्यित हल्ले केले जाणार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने एक महत्त्वपूर्ण बैठकीही बोलावली आहे. सध्या या बैठकीत काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.