
Donald Trump to Impose 50 Percent Tariff on China over supplying weapons to Iran
नुकतेच शनिवारी (११ एप्रिल) पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका (America) इराणमध्ये शांतता बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांतील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु इराणने अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास नकार दिला. यामुळे चर्चेत कोणताही ठोस निकाल लागला नाही. या चर्चेदरम्यान अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने चीन इराणला गुप्तपणे शस्त्रास्त्रे पुरवत असल्याचा दावा केला होता. या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली होती.
परंतु अमेरिकेच्या वॉशिंग्टन येथील चीनच्या दूतावासाने हा दावा फेटाळत, अमेरिकेने कोणत्याही पुरव्याशिवाय खोटी माहिती पसरवू नये असे म्हटले. याच वेळी इराणशी अमेरिकेसमोर झुकण्यास नकार दिल्याने चर्चा फिस्कटली आणि ट्रम्प यांचा पार चढला. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी थेट चीनला लक्ष्य करत बाह्य हस्तक्षेपामुळे चर्चेत अडथळा येत असल्याचे म्हटले.
ट्रम्प यांनी चीन(China)ला थेट इशारा देत बाह्य हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असे म्हटले. त्यांनी ड्रॅगनला इशारा दिला की या संघर्षात चीनने लुडबूड करण्याचा प्रयत्न केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. मी त्यांना माफ करणार नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प चीनवर ५०% टॅरिफ लादण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.
याच वेळी ट्रम्प यांनी धमकीसोबतच चीनला एक व्यापारी ऑफरही दिली आहे. चीनने इराणकडून महागडे तेल घेण्याऐवजी अमेरिकेकडून स्वस्त दरात तेल खरेदी करावे. इराणपेक्षा अमेरिकेकडे जास्त क्षमता आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तज्ञांच्या मते, ट्रम्प इराणला एकटं पाडण्याचा, चीनला इराणपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Trump Warns China : इराणला मदत करणं चीनला पडणार महागात; ट्रम्प यांनी दिला ड्रॅगनला थेट इशारा
Ans: ट्रम्प यांनी म्हटले, चीनने इराणला शस्त्र साठा पुरवल्यास याचे त्यांना गभीर परिणाम भोगावे लागती. ट्रम्प चीनला माफ करणार नाहीत. तसेच त्यांच्यावर ५० टक्के टॅरिफ लादण्याची देखील शक्यता आहे.
Ans: ट्रम्प यांनी चीनला अमेरिकेकडून स्वस्त दरात तेल खरेदी करण्याची ऑफर दिली आहे.
Ans: तज्ञांच्या मते, ट्रम्प चीनला इराणपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे इराण संघर्षात एकटाच पडेल.