डोनाल्ड ट्रम्प यांची फार्मा कंपन्यांवर वक्रदृष्टी, २५० टक्के टॅरिफ लावणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंपने भारताला टार्गेट करत फार्मा उद्योगावर २५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. सुरुवातीला कमी प्रमाणात टॅरिफ लावला जाईल, पण पुढील वर्ष-दोन वर्षांत तो हळूहळू वाढवून २५० टक्क्यांपर्यंत नेण्यात येईल. विदेशी औषधांच्या आयातीवर निर्भर न राहता अमेरिकेत औषधनिर्मितीला प्रोत्साहन देणे हा यामगाचा उद्देश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Donald Trump Tarrif Threat : भारतावर पुन्हा एकदा कर वाढवणार ट्रम्प? २५% पेक्षा जास्त दराची धमकी
फार्मास्युटिकल क्षेत्रावर ही टॅरिफ वाढवण्याची योजना अमेरिकेला जागतिक औषध बाजारात अधिक स्वावलंबी बनवण्याचा ट्रंपचा दृष्टीकोन आहे. औषध निर्मिती आणि निर्यातीत भारताचं जगात महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे या निर्णयामुळे भारताच्या फार्मा क्षेत्राला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
ट्रम्प यांनी सेमीकंडक्टर आणि चिप्सवरही लवकरच टॅरिफ वाढवण्याची तयारी असल्याचं सांगितले, परंतु त्याबाबत अधिक तपशील अद्याप दिले गेले नाहीत. भारत या क्षेत्रात जलद प्रगती करत असून अनेक कंपन्या सेमीकंडक्टर उत्पादनासाठी देशात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे या नवीन शुल्कामुळे या उद्योगांवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
ट्रंपने म्हटले आहे की, त्यांचा हेतू असा आहे की औषधे आणि सेमीकंडक्टरचे उत्पादन अमेरिकेत वाढावे आणि परदेशावर अवलंबित्व कमी व्हावे. याच दृष्टीने तो पुढील काही काळात टॅरिफ वाढवेल आणि त्या माध्यमातून अमेरिकन उद्योगांना प्रोत्साहन देईल.ट्रंपने भारताला ‘चांगला व्यापारिक भागीदार’ मानत नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते, भारताने अमेरिका आणि भारतातील व्यापारात उच्च टॅरिफ लावून गैरव्यवहार केला आहे. त्यांनी पुढे म्हटले की, भारताने रूसकडून कच्चा तेल खरेदी करणे अमेरिकेला मान्य नाही आणि त्यासाठी भारतावर स्वतंत्रपणे शुल्क वाढवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
याआधीच ट्रंपने भारतावर २५ टक्के शुल्क लावल्याची घोषणा केली आहे, आणि आता तो हा टॅरिफ पुढील काळात आणखी वाढवण्याचा इरादा बाळगतो. भारताने या आरोपांचा जोरदारपणे प्रत्युत्तर दिले असून, अमेरिका आणि युरोपियन संघावर ‘दुहेरी मापदंड’ स्वीकारल्याचा आरोप केला आहे. भारताच्या या प्रतिसादातून द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
Russia On Trump : ‘हा रशियासाठी धोका’ ; ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीवर पुतिन यांचा इशारा
एकंदरीत, ट्रंपच्या या निर्णयामुळे भारताच्या फार्मा आणि सेमीकंडक्टर उद्योगांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अमेरिकेसोबतच्या व्यापारात होणाऱ्या या तणावामुळे भविष्यात भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक धोरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, भारताला जागतिक बाजारपेठेत आपली स्थिती मजबूत करण्यासाठी नवीन रणनीती आखणे गरजेचे ठरणार आहे.