Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran Tension: ‘ट्रम्प तुला मारून टाकतील!’ अमेरिकन सिनेटरची इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांना उघडपणे धमकी, जगावर युद्धाचे सावट

Iran Protests : इराणमध्ये एका आठवड्याहून अधिक काळ सुरू असलेले निदर्शने अनेक भागात पसरली आहेत, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती निर्माण झाली आहे. इराणी सुरक्षा दल निदर्शकांवर प्राणघातक बळाचा वापर करत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 08, 2026 | 11:39 AM
Donald Trump will kill you US senator openly threatens Iran's Supreme Leader Khamenei

Donald Trump will kill you US senator openly threatens Iran's Supreme Leader Khamenei

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांना इशारा दिला आहे की, निदर्शकांची कत्तल न थांबवल्यास डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या हत्येचे आदेश देऊ शकतात.
  •  महागाई आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे इराणमध्ये हिंसक निदर्शने सुरू असून, आतापर्यंत ३५ हून अधिक नागरिकांचा सुरक्षा दलांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे.
  •  अमेरिकेने जशी कारवाई व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या विरोधात केली, तशीच वेळ आता इराणवर येईल, असा सज्जड दम अमेरिकेने भरला आहे.

Lindsey Graham threat to Ayatollah Khamenei : जगाच्या पाठीवर सध्या युद्धाचे ढग दाटून आले आहेत. व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलेल्या धडाकेबाज कारवाईनंतर आता अमेरिकेचा मोर्चा इराणकडे वळल्याचे दिसत आहे. अमेरिकेचे प्रभावशाली सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. “जर तुम्ही स्वतःच्याच देशातील निदर्शकांना मारणे थांबवले नाही, तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) तुम्हाला संपवण्याचे आदेश देतील,” अशा कडक शब्दांत ग्राहम यांनी इराणला सुनावले आहे.

इराणमध्ये रक्ताचा सडा; जनता रस्त्यावर

इराणमध्ये गेल्या आठवड्यापासून महागाई, बेरोजगारी आणि देशाच्या ढासळत्या चलनामुळे जनक्षोभ उसळला आहे. हा वणवा आता केवळ शहरांपुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातही पसरला आहे. आंदोलक आता थेट खामेनेई यांच्या विरोधात “हुकूमशहाचा अंत व्हावा” अशा घोषणा देत आहेत. आंदोलने दडपण्यासाठी इराणी सुरक्षा दलांनी आंदोलकांवर थेट गोळीबार सुरू केला असून, आतापर्यंत ३५ निष्पाप नागरिकांचा यात बळी गेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये इराणमधील भीषण परिस्थिती दिसून येत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन

लिंडसे ग्राहम यांचा इराणला सज्जड दम

एका टेलिव्हिजन मुलाखतीदरम्यान ग्राहम यांनी इराणच्या राजवटीला थेट इशारा दिला. ते म्हणाले, “तेहरानच्या नेत्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना हलक्यात घेऊ नये. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये जे केले, तेच ते इराणमध्येही करू शकतात. जर तुम्ही चांगल्या जीवनाची मागणी करणाऱ्या तुमच्याच जनतेवर गोळ्या झाडणे सुरू ठेवले, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.” ग्राहम यांनी इराणला स्पष्ट केले की, अमेरिका आता केवळ निषेध नोंदवून शांत बसणार नाही, तर लष्करी कारवाईचा मार्ग स्वीकारेल.

⚠️ SIGNIFICANT STATEMENT – U.S. Senator Says Trump Would Kill Khamenei if Iran Keeps Gunning Down Protesters A senior U.S. senator is openly warning Iran’s leadership that continued lethal repression could trigger consequences at the very top, as nationwide protests intensify… pic.twitter.com/p1nIOn4Zqy — Jewish Breaking News (@JBreakingNews) January 7, 2026

credit : social media and Twitter

व्हेनेझुएलाच्या कारवाईचा धसका?

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना एका गुप्त मोहिमेद्वारे अटक करून अमेरिकेत आणले. या घटनेमुळे इराणच्या इस्लामिक राजवटीत भीतीचे वातावरण आहे. लिंडसे ग्राहम यांनी या कारवाईचा उल्लेख करत सांगितले की, अमेरिकन इच्छाशक्ती काय आहे, हे जगाने मादुरोच्या उदाहरणावरून पाहिले आहे. इराणमध्येही जर परिस्थिती हाताबाहेर गेली, तर अमेरिकन सैन्य थेट खामेनेईंना लक्ष्य करू शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral Video: ‘जर भारत आणि तालिबानला मजा आली नाही तर पैसे परत’; पाकिस्तान लष्कर प्रमुखाला ‘फिल्मीगिरी’ नडली, जगभरात बनले हसे

आंदोलनात पोलिसांचा सहभाग?

इराणमधील अब्दानान आणि इतर शहरांमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनेक ठिकाणी पोलीस कर्मचारी स्वतःचे गणवेश उतरवून आंदोलकांमध्ये सामील होत असल्याचे दावे केले जात आहेत. जर इराणचे लष्कर आणि पोलीसच जनतेच्या बाजूने उभे राहिले, तर खामेनेई यांची सत्ता धोक्यात येऊ शकते. या अंतर्गत बंडाळीचा फायदा घेऊन अमेरिका इराणमध्ये सत्तापालट घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकन सिनेटरने खामेनेईंना धमकी का दिली?

    Ans: इराणमध्ये सुरू असलेल्या शांततामय आंदोलनांवर सुरक्षा दले गोळीबार करत असल्याने आणि त्यात नागरिकांचा मृत्यू होत असल्याने अमेरिकेने ही धमकी दिली आहे.

  • Que: इराणमध्ये आंदोलनांचे मुख्य कारण काय आहे?

    Ans: वाढती महागाई, बेरोजगारी आणि इराणच्या चलनाची झालेली घसरण यामुळे संतप्त झालेली जनता रस्त्यावर उतरली आहे.

  • Que: अमेरिकेने व्हेनेझुएलाचे उदाहरण का दिले?

    Ans: अमेरिकेने नुकतीच व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांना अटक केली आहे. तशीच लष्करी कारवाई इराणमध्येही होऊ शकते, हे दर्शवण्यासाठी हे उदाहरण दिले.

Web Title: Donald trump will kill you us senator openly threatens irans supreme leader khamenei

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • iran
  • Iran News

संबंधित बातम्या

Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन
1

Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन

ट्रम्प यांचा जगाला मोठा झटका! UN सह ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून अमेरिकेची एक्झिट
2

ट्रम्प यांचा जगाला मोठा झटका! UN सह ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून अमेरिकेची एक्झिट

ट्रम्पचा व्हेनेझुएलावर दबाव वाढला! ‘या’ देशांसोबत आर्थिक संबंध तोडण्याचा दिला अल्टीमेटम
3

ट्रम्पचा व्हेनेझुएलावर दबाव वाढला! ‘या’ देशांसोबत आर्थिक संबंध तोडण्याचा दिला अल्टीमेटम

डोनाल्ड ट्रम्पने दिला भारतीय विद्यार्थ्यांना झटका! US मध्ये स्टुडंट-वर्क व्हिसावर सक्ती
4

डोनाल्ड ट्रम्पने दिला भारतीय विद्यार्थ्यांना झटका! US मध्ये स्टुडंट-वर्क व्हिसावर सक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.