Russia On Trump : 'हा रशियासाठी धोका' ; ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीवर पुतिन यांचा इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
रशियाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना त्यांच्या व्यापार भागीदार देशांना न धमकवण्याचे म्हटले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन(Vladimir Putin) यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना तीव्र विरोध केला आहे. तसेच क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी अमेरिकेच्या धमक्या अयोग्य असल्याचे म्हटले आहे. तसेच रशियाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही देशांना व्यापारी भागीदार निवडण्यासाठी भाग पाडणे शक्य नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मित्राला नजरकैद; ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, नेमकं प्रकरण काय?
दिमित्री पेस्कोव्ह यांनी, रशियाशी व्यापार संबंध असलेल्या मित्र देशांना त्यांचा भागीदार निवडण्याचा अधिकार आहे, यामुळे अशा धमक्या देणे निरर्थक असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी म्हटले की, कोणत्याही देशाला रशियासोबत व्यापार थांबवण्यासाठी भाग पाडणे देखील चुकीचे आहे. या कृतीला रशियासाठी आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठी धोका समजले जाईल.
दिमित्री पेस्कोव्ह यांनी, प्रत्येक देशाला त्यांच्या सार्वभौमत्वासाठी त्यांचे व्यापारी भागीदार आणि आर्थिक भागीदार निवडण्याचा अधिकार आहे. आपल्या राष्ट्राचे हित जपण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे असे म्हटले आहे.
नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियाशी व्यापार केल्यामुळे २५% टक्के कर लागू केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी भारतावर हल्ला बोल केला आहे. ट्रम्प यांनी भारतावर रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये लोक मरत आहेत आणि याचा भारताला कोणताही फरक पडत नसल्याचा आरोप केला आहे. यामुळे आता भारताला २५% टॅरिफ द्यावेच लागणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.
याच वेळी भारताने देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या आरोपांना तीव्र विरोध केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचे म्हटले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, भारताला लक्ष्य केले जात आहे, हे चुकीचे असून अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या शब्द आणि कृतीमध्ये तितकाच फरक आहे.
भारताने स्पष्ट केले आहे की, जसा अमेरिका आणि युरोपीय देशांना रशियाशी व्यापार करण्याचा आणि देशाचे हित साधण्याचा अधिकार आहे, तसाच अधिकार भारतालाही आहे. यामुळे अमेरिका आणि युरोपीय देश दुटप्पीपण करत आहे. तसेच असेही स्पष्ट केले आहे की, भारत मोठी अर्थव्यवस्था असून आपल्या देशाचे राष्ट्रीय आणि आर्थिक हितासाठी योग्य ती पावले उचलत राहील.
पुतिन यांचा संताप अनावर! अमेरिकेच्या धमकीनंतर ‘या’ क्षेपणास्त्राच्या तैनातीवर घेतला मोठा निर्णय






