Donald Trump Tarrif Threat :भारतावर पुन्हा एकदा कर वाढवणार ट्रम्प? २५% पेक्षा जास्त दराची धमकी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Donald Trump Threat To India : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा भारतावर हल्ला बोल केला आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफची धमकी दिली आहे. पुढील २४ तासांमध्ये ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ (Tarrif) वाढवणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा सर्वत्र खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी भारताच्या रशियासोबत व्यापार सुरु ठेवण्याच्या निर्णयानंतर ही घोषणा केली आहे. यापूर्वी त्यांनी भारतावर २५% टॅरिफ लादण्याची धमकी दिली होती, मात्र आता डोनाल्ड ट्रम्प हा कर वाढवणार असल्याचे म्हणत आहेत.
ट्रम्प यांनी CNBC वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, गेल्या काही काळात भारत चांगला व्यापारी भागीदारी राहिलेला नाही. भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धात त्यांच्या सैन्य कारवायांना मदत पुरवत आहेत. आधी आम्ही २५% टक्क्यापर्यंत कर लादणार होतो, पण आता पुढील २४ तासांत हा कर वाढवणार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले.
ट्रम्प यांनी आरोप केला की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, यामुळे रशियाच्या लष्करी हत्यारांना इंधन मिळत आहे, त्यांना मोठ्या प्रमाणात निधी पुरवला जात आहे आणणि ते असेच करत राहिले तर मला आनंद होणार नाही.
पुतिन यांचा संताप अनावर! अमेरिकेच्या धमकीनंतर ‘या’ क्षेपणास्त्राच्या तैनातीवर घेतला मोठा निर्णय
रशियाची डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी
याच वेळी रशियाने (Russia)देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावर कर लादण्याच्या धमकीला तीव्र विरोध केला आहे. रशियाचे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी, आपला मित्र राष्ट्र भारताला समर्थन दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतविरोधी अमेरिकेची किंवा डोनाल्ड ट्रम्प यांची कोणतीही विधाने रशियासाठी धोका मानली जातील.रशियाने स्पष्ट केले आहे की, अमेरिका किंवा इतर कोणताही देश कोणत्याही देशाला रशियापासून व्यापार करण्यास थांबवू शकत नाही. प्रत्येक देशाला त्याच्या हितासाठी, सार्वभौमत्वासाठी आपला व्यापारी भागीदार निवडण्याचा अधिकार आहे.
🇺🇸❗🇮🇳 President Trump says he will raise tariffs on India “substantially” over the next 24 hours. pic.twitter.com/6nGF9H7Zou
— Molo44 🇮🇹🇺🇦 (@MoloWarMonitor) August 5, 2025
याच वेळी भारताने देखील अमेरिकेच्या धमकीला सडेतोड उत्तर दिले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांचे आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचे म्हटले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, भारताला लक्ष्य केले जात आहे, हे चुकीचे असून अमेरिकाच्या शब्द आणि कृतीमध्ये तितकाच फरक आहे. अमेरिका देखील रशियाकडून युरेनियम, पॅलेडियम आणि खते आयात करत आहे. जर ते रशियाशी व्यापार करु शकतात, तर भारतही करु शकतो.
शिवाय खुद्द अमेरिकेने जागतिक बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी भारताला आवाहन केले होते, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचेन स्पष्ट केले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, भारताची अर्थव्यवस्था प्रमुख आणि उभरती आहे, यामुळे आपले राष्ट्रीय हित आणि आर्थिक सुरक्षितता जपण्यासाठी स्वतंत्र पावले उचलत राहिल.
Russia On Trump : ‘हा रशियासाठी धोका’ ; ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीवर पुतिन यांचा इशारा