Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत खळबळजनक विधान केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 03, 2026 | 08:35 PM
युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा (Photo Credit- AI)

युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा (Photo Credit- AI)

Follow Us
Close
Follow Us:
  • “आता वाटाघाटीसाठी खूप उशीर झालाय!”
  • इराणचे लष्कर आणि नेतृत्व संपुष्टात
  • डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा
US-Israel Iran War News: अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त लष्करी हल्ल्यांनी इराणला जेरीस आणले असून, मध्य पूर्वेतील तणाव आता एका नव्या वळणावर पोहोचला आहे. इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. “इराणची हवाई सुरक्षा यंत्रणा (Air Defense), हवाई दल, नौदल आणि त्यांचे नेतृत्व आता पूर्णपणे संपुष्टात आले आहे,” असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

‘इराणला आता चर्चा हवीय, पण वेळ निघून गेलीय’

मंगळवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराण आता वाटाघाटी करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, अमेरिकेने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. ट्रम्प म्हणाले, “इराणने आता चर्चेची तयारी दर्शवली आहे, पण मी त्यांना सांगितले आहे की आता खूप उशीर झाला आहे. ज्या सरकारकडून गेल्या ४७ वर्षांपासून अमेरिकन नागरिकांवर हल्ले केले जात आहेत, त्या ‘सैतानी’ राजवटीचा खात्मा करण्याची ही शेवटची संधी होती.”

🇺🇸#MUNDO #CHTV AHORA: Trump sobre Irán: Su defensa aérea, su Fuerza Aérea, su Marina y su liderazgo han desaparecido. Quieren hablar. Dije: “¡Demasiado tarde!” pic.twitter.com/rRtbPZUe8Q — CHTV HONDURAS (@ChtvH3124) March 3, 2026

PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! आखाती देशांच्या नेत्यांशी तातडीची चर्चा; युद्धस्थितीवर स्पष्ट केली भारताची भूमिका

अमेरिकेपर्यंत पोहोचणारी क्षेपणास्त्रे रोखण्याचे लक्ष्य

इराणवर करण्यात आलेल्या या भीषण लष्करी कारवाईचे समर्थन करताना ट्रम्प यांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. “इराण अशा क्षेपणास्त्रांची निर्मिती करत होता जी थेट अमेरिकेपर्यंत धडक देऊ शकत होती. ही कट्टरवादी राजवट अण्वस्त्रांच्या हट्टावर ठाम होती आणि अमेरिकेसाठी तो एक गंभीर धोका होता. युरोप आणि इतर परदेशांतील अमेरिकन तळांना लक्ष्य करण्याची क्षमता इराणकडे आधीच होती, पण त्यांच्या मुख्य भूमीला धोका निर्माण होण्यापूर्वीच आम्ही ही कारवाई केली आहे,” असे ट्रम्प यांनी नमूद केले.

सैन्य मोहिमेत अमेरिका अपेक्षेपेक्षा पुढे

इराणविरुद्ध सुरू असलेल्या या लष्करी मोहिमेबद्दल माहिती देताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका आपल्या नियोजित वेळेपेक्षा बरेच पुढे आहे. “या मोहिमेला कितीही वेळ लागला तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. ही लढाई प्रदीर्घ चालली तरी आम्ही कंटाळणार नाही. आम्ही इराणला वेळोवेळी इशारा दिला होता, पण त्यांनी तो गांभीर्याने घेतला नाही. गरज पडल्यास आम्ही आमचे पायदळ देखील मैदानात उतरवू,” अशी कडक चेतावणी ट्रम्प यांनी दिली आहे.

अद्याप सर्वात मोठे हल्ले होणे बाकी

सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिका आणि इस्रायलचे हे ‘जॉइंट ऑपरेशन’ अत्यंत अचूकपणे सुरू आहे. “आम्ही इराणला पूर्णपणे कुचले असून त्यांच्यावर जबरदस्त हल्ले केले जात आहेत. मात्र, अद्याप सर्वात मोठे हल्ले होणे बाकी आहे. अमेरिकेचे सैन्य हे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य असून आम्ही त्याचा प्रभावीपणे वापर करत आहोत,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. सध्याच्या परिस्थितीत इराण एकाकी पडताना दिसत असून, ट्रम्प यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मध्य पूर्वेतील भौगोलिक-राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Iran Israel War: शपथविधीनंतर ४८ तासांतच ‘गेम ओव्हर’! इराणच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याचा इस्रायलकडून खात्मा, तेहरान हादरलं

Web Title: Donald trumps clear warning to iran in the wake of war said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Iran Israel War: शपथविधीनंतर ४८ तासांतच ‘गेम ओव्हर’! इराणच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याचा इस्रायलकडून खात्मा, तेहरान हादरलं
1

Iran Israel War: शपथविधीनंतर ४८ तासांतच ‘गेम ओव्हर’! इराणच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याचा इस्रायलकडून खात्मा, तेहरान हादरलं

Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो सेक्टरला बसणार मोठा फटका
2

Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो सेक्टरला बसणार मोठा फटका

Iran Israel War: इराणनंतर लेबनॉन नष्ट होणार? इस्त्रायलने दिले ‘हे’ भयंकर आदेश
3

Iran Israel War: इराणनंतर लेबनॉन नष्ट होणार? इस्त्रायलने दिले ‘हे’ भयंकर आदेश

इराणमधील अणुकेंद्रांवर युद्धाचे सावट! अणू गळती झाल्यास ८ देशांत पसरणार ‘सायलेंट किलर’ विष; पिण्याच्या पाण्यासाठीही होणार हाहाकार
4

इराणमधील अणुकेंद्रांवर युद्धाचे सावट! अणू गळती झाल्यास ८ देशांत पसरणार ‘सायलेंट किलर’ विष; पिण्याच्या पाण्यासाठीही होणार हाहाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.