इराणच्या 'या' बड्या अधिकाऱ्याचा इस्रायलकडून खात्मा (Photo Credit- AI)
इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणचे संरक्षण तंत्र आधीच खिळखिळे झाले होते. यापूर्वीच्या हल्ल्यांमध्ये माजी संरक्षण मंत्री अझीझ नासिरजादेह आणि आयआरजीसी कमांडर मोहम्मद पाकपूर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी मारले गेले होते. या आणीबाणीच्या परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी रिव्होल्युशनरी गार्ड्सचे जनरल सैयद माजिद यांच्याकडे कार्यवाहक संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सोपवली होती. मात्र, इस्रायली ‘चॅनल १२’ च्या रिपोर्टनुसार, तेहरानमध्ये एका गुप्त मोहिमेद्वारे इस्रायलने त्यांना लक्ष्य केले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
💥BREAKING: Iran’s new Defence Minister assassinated. 24hours after taking over the role from his predecessor who was also assassinated. pic.twitter.com/w2RF5Xl5bD — Crypto Rover (@cryptorover) March 3, 2026
शनिवारपासून सुरू झालेल्या अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यांनी इराणमधील अणुकेंद्रे, क्षेपणास्त्र तळ, एअर डिफेन्स सिस्टम आणि लष्करी कमांड सेंटर्स उद्ध्वस्त केली आहेत. ‘इराण रेड क्रिसेंट सोसायटी’ने दिलेल्या माहितीनुसार, या युद्धात आतापर्यंत ७८७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये १७६ बालकांचा समावेश आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी स्पष्ट केले आहे की, इराणची क्षेपणास्त्र क्षमता आणि अणू कार्यक्रम पूर्णपणे संपुष्टात येईपर्यंत हे हल्ले सुरूच राहतील.
नव्या संरक्षण मंत्र्यांच्या मृत्यूमुळे तेहरानमध्ये कमालीचा हडकंप माजला आहे. इराणने प्रत्युत्तरादाखल काही क्षेपणास्त्रे डागली असली, तरी इस्रायलने दावा केला आहे की इराणचे बहुतांश वरिष्ठ नेतृत्व आता संपुष्टात आले आहे. लष्करी नेतृत्वाच्या कमतरतेमुळे इराणचे संरक्षण दल कमकुवत झाले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील इराण एकाकी पडताना दिसत आहे. अनेक मुस्लिम देशांनी या संघर्षात इराणला उघड साथ देण्याचे टाळले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, इस्रायलचा आताचा उद्देश केवळ लष्करी तळांना लक्ष्य करणे नसून इराणमधील सत्ता बदलणे हा आहे. वरिष्ठ नेत्यांना टार्गेट करून इराणचे नेतृत्व कमकुवत करणे आणि त्याद्वारे देशांतर्गत बंडाला प्रोत्साहन देणे, अशी इस्रायलची रणनीती असल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण मध्य पूर्वेतील युद्धाला आता एक वेगळे आणि अधिक भीषण वळण मिळाले आहे.
Iran Israel War: इराणनंतर लेबनॉन नष्ट होणार? इस्त्रायलने दिले ‘हे’ भयंकर आदेश






