Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काश्मीर मुद्द्यात डोनाल्ड ट्रम्प यांची ढवळाढवळ; भारत पाकिस्तानची समस्या सोडवणार असल्याचा केला दावा

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अमेरिकेने मध्यस्थीची भूमिका निभावली असून दरम्यान ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर आणखी एक मोठा दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 11, 2025 | 01:16 PM
भारत-पाक युद्धबंदीवरून डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी; म्हणाले, मी मध्यस्थी केलीच नाही, पण...

भारत-पाक युद्धबंदीवरून डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी; म्हणाले, मी मध्यस्थी केलीच नाही, पण...

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन: भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी (10 मे) युद्धबंदी करण्यात आली. याची घोषाणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते की, भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धविरामासाठी सहमती दर्शवली आहे. याचा मला आनंद होत आहे. तसेच त्यांनी सांगितले की, यामध्ये अमेरिकेने मध्यस्थी करुन दोन्ही देशांत युद्धबंदी घडवून आणली. त्यांच्या या घोषणेनंतर भारत सरकार आणि पाकिस्तनान याची पुष्टी केली.

दरम्यान आता ट्रम्प यांनी काश्मीरबद्दल एक मोठा दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीवर भाष्य केले आहे.

ट्रम्प यांनी म्हटले आहे की, “भारत आणि पाकिस्तान यांच्या नेतृत्वाचा मला अभिमान वाटतो.  चार दिवसांच्या युद्धानंतर दोन्ही देशांना आता युद्ध थांबवण्याची गरज आहे, याचे शहाणपण त्यांच्यात आले आहे. युद्ध असेच सुरु राहिले असते, तर लाखो लोकांचा बळी गेला असता.

अनेक निष्पाप लोक मृत्यूमुखी पडले असते. मोठा विनाश झाला असता. तसेच मला अभिमान आहे की अमेरिकेच्या मदतीने भारत आणि पाकिस्तानमध्ये एक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेण्यात आला. ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की, मी दोन्ही देशांसोबत व्यापर वाढवण्यावर भर देणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर जगातील प्रमुख देशांची प्रतिक्रिया; जाणून घ्या कोण काय म्हणाले?

काश्मीर मुद्यावर तोडगा काढणार ट्रम्प

तसेच ट्रम्प यांनी असाही दावा केला आहे की,  दोन्ही देशांमध्ये काश्मीर समस्येवरही तोडगा काढणार आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी दोन्ही देशांसोबत काश्मीर मुद्यावरही चर्चा करणार आहे. हजार वर्षानंतर काश्मीर मुद्यावर चर्चा होणार, यावर तोडगा काढण्यासाठी एकत्रितपणे ही चर्चा करु असे ट्रम्प यांनी म्हटले. यासाठी देव भारत आणि पाकिस्तानला चांगल्या नेतृत्त्वासाठी आशिर्वाद देवो. असेही ट्रम्प यांनी म्हटले.

युद्धबंदीची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये सायंकाळी 5.30 वाजता युद्धबंदीचा दावा केला होता. यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिवांनी याची अधिकृत घोषणा केली. दरम्यान भारताने सांगितले की, युद्धबंदीबाबत देशांमध्ये स्पष्टपणे देशांदरम्यान झाले आहे. दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये याबाबत चर्चा झाली आणि युद्धबंदी लागू करण्यात आली.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा लागू केल्यानंतर शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. तथापि, पाकिस्तानने अवघ्या तीन तासानंतर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमांवर हल्ला केला. तसेच गुजरातच्या कच्छवरही ड्रोन हल्ले केले. भारताने देखील या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच भारत सरकारने सैन्याला योग्य कारवाईचे आदेश दिले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- जगातील युद्ध काही संपेना! इस्रायल-हमास युद्ध सुरुच; गाझावरील हल्ल्यात 23 पॅलेस्टिनींचा मृत्यू

Web Title: Donald trumps kashmir offer to india after ceasefire says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • World news

संबंधित बातम्या

Gold Rates : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोन्यातील तेजीला ब्रेक; अमेरिकेतची ‘ही’ आकडेवारी ठरणार टर्निंग पॉईंट
1

Gold Rates : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोन्यातील तेजीला ब्रेक; अमेरिकेतची ‘ही’ आकडेवारी ठरणार टर्निंग पॉईंट

World Finance News :शांत बसतील ते ट्रम्प कसले; प्रशासनाचा ‘परप फ्युचर्स’ला हिरवा कंदील; आर्थिक बाजारात संघर्षाची चिन्हे
2

World Finance News :शांत बसतील ते ट्रम्प कसले; प्रशासनाचा ‘परप फ्युचर्स’ला हिरवा कंदील; आर्थिक बाजारात संघर्षाची चिन्हे

Diwali In USA: ‘मामदानींनी रांगोळी काढली, अब्दुल सय्यद यांनी दिवा लावला’, अमेरिकन मुस्लिम नेत्यांची मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी
3

Diwali In USA: ‘मामदानींनी रांगोळी काढली, अब्दुल सय्यद यांनी दिवा लावला’, अमेरिकन मुस्लिम नेत्यांची मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी

Iran-US War : ‘युद्ध थांबवा, आम्ही 48 तासांत होर्मुझ उघडू, नाहीतर विनाश होईल…’; इराणचा अमेरिकेला अंतिम इशारा
4

Iran-US War : ‘युद्ध थांबवा, आम्ही 48 तासांत होर्मुझ उघडू, नाहीतर विनाश होईल…’; इराणचा अमेरिकेला अंतिम इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.