
Donald Trump
या थिअरीमध्ये एखादा नेता स्वत:ला जाणीवपूर्वक जगासाठी धोकादायक दाखवतो. म्हणजेच विरोधी धोरणे, दबावाचा वापर करुन जगात अनिश्चितता निर्माण करणे, अस्थिरता आणि धोकायाद परिस्थिती उभारण्याचा प्रयत्न करतो. याचा उद्देश शत्रू देशाने हा नेता कोणत्याही टोकाला जाऊ शकतो हे मानून युद्ध टाळावे, संघर्ष टाळावा असा असतो.
या थेअरीचा सर्वात पहिला वापर हा अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राअध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनामच्या युद्धादरम्यान केला होता. निक्सन यांनी शत्रू देशाला अण्वस्त्र हल्ल्यांची भिती दाखवली होती. या दबावाला बळी पडून शत्रूने माघार घ्यावी असा याचा हेतू होता. परंतु ही थेअर दीर्घकाळासाठी टीकू शकली नाही.
राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प दुसऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळापासून परराष्ट्रांवर विरोधी धोरणे राबवत आहेत. अमेरिका फर्स्ट हवाला देत त्यांनी देशातून बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइझेशन सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय संघटानांमधून बाहेर पडत निधी बंद केला आहे. युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प देशांवर प्रचंड टॅरिफ लादत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच कधी ग्रीनलँड, तर कधी कॅनडा अमेरिकेचा भाग बनवण्याचा हट्ट धरत आहे. याशिवाय त्यांनी व्हेनेझुएलावरही हल्ला करुन तेलावर नियंत्रण मिळवले आहे. ज्यामुळे जागतिक तेल बाजारपेठांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. दुसरीकडे मध्यपूर्वेत इराणविरोधीत आक्रमक भूमिका घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी दावोस येथे झालेल्या जागतिक वार्षिक आर्थिक मंचात ट्रम्प यांनी ग्रीनलँड, टॅरिफ यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय मुद्यांवर त्यांच्यावर जागतिक नेत्यांकडून झालेल्या त्यांचे हुकूशाह म्हणून वर्णन करण्यात आले होते. यावर ट्रम्प यांनी ते हुकूमशाह असल्याची कबुली दिली होती. त्यांनी म्हटले होते की कधी-कधी जगाला हुकूमशाहची देखील गरज असते. त्यांच्या या सर्व आक्रमक धोरणांमुळे, वक्तव्यामुळे सध्या ते जगासाठी एक वाईट नेता ठरले आहेत. परंतु याचा त्यांना कोणताही फरक पडलेला नाही. यामुळेच ट्रम्प यांना Madman Theory शी जोडले जात आहे.