
India EU Trade Deal
युरोपियन कॉउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्ट यांनी ट्रम्पवर हल्लाबोल करत भारत आणि ईयू मुक्त व्यापार करार हा वाढत्या टॅरिफ (Tariff) आणि संरक्षणवादी धोरणाविरोधात स्पष्ट राजकीय संदेश आहे. कोस्टा यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, आज बहुध्रुवीय जगात, भारत आणि युरोप जवळ येणे महत्वाचे होते. त्यांनी असेही म्हटले की, भारतासोबतचा करार हा केवळ एक व्यापार भागीदारी नव्हे तर भू-राजकीनीतीवर आधारित असून अत्यंत महत्त्वाच आहे.
यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये स्थिरता, विश्वास आणि सुरक्षा प्रदान होणार आहे. ही भागीदारी जागतिक व्यवस्थेचे कवच ठरण्याची आशा अँटोनियो कोस्टा यांनी व्यक्त केली आहे. तसेच वाढत्या टॅरिफ धोरणाला हे चोख प्रत्युत्तर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा मते अनेक देश टॅरिफचा वापर करुन संरक्षणवादी धोरणाकडे वळत आहेत. पण भारत-ईयू करार जगाला संदेश देतो की युरोपीय संघ टॅरिफपेक्षा करारातील विश्वासाला महत्व देतो.
दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या कराराचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, दोन मोठ्या लोकशाही देशांतील एक निर्याणक अध्याला सुरुवात झाली आहे. हा करार जागतिक स्थिरता प्रदान करेल असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
दरम्यान याच वेळी भारत आणि युरोपमधील या करारामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट होताना दिसत आहे. ट्रम्प प्रशासानातील उच्च स्तरीय अधिकाऱ्यांनी युरोपला देशद्रोही म्हटले आहे. तसेच युरोप स्वत:विरुद्ध रशियाला फंड पुरवत असल्याचे म्हटले आहे.