
Iranian Rial Collapse
रियालच्या या निच्चांकी घसरणीमुळेच इराणने डिसेंबर २०२५ च्या अखेरीस खामेनेई सरकारविरोधात तीव्र आंदोलन झाले होते. परंतु खामेनेई प्रशासनाने हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला आणि हे आंदोलन पुढे जाऊन हे आंदोलन देशांतर्गत आर्थिक संकट, वाढती महागाई, चलन रियालची घसरण, युद्ध परिस्थिती, महालांवरील दडपशाहीविरोधात बदलले. या आंदोलनाने तीव्र रुप धारण केले होते. यामध्ये २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच अनेकांना जबरदस्तीने अटकही करण्यात आली आहे.
रियालच्या घसरण होण्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये मुख्य कारण म्हणजे अमेरिका आणि पाश्चत्य देशांनी इराणवर लादलेले निर्बंध आहेत. या निर्बंधामुळे इकाणच्या तेल निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे देशात डॉलरचा पुरवठा कमी पडत आहे. यामुळे इराणमधील महागाई प्रचंड वाढली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये इराणमधील महागाईचा दर हा ४२ टक्क्याहून अधिक होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या अहवालानुसार, २०२६ मध्ये जानेवारी महिन्यात ही महागाई ४० टक्क्यांवर आहे.
दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे खामेनेई सरकारची आर्थिक धोरणे, ज्यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. सरकारने सबसिडीवर मिळणाऱ्या डॉलरची योजना बंद केल्याने आयात महाग झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे इराणी लोकांचा रियावरील विश्वास कमी झाला आहे. यामुळे इराणी लोक आपल्या मालमत्तेला डॉलर, सोने किंवा इतर प्रकारांमध्ये गुंतवत आहे. यामुळे रियालवर अधिक दबाव वाढत आहे. याशिवाय इस्रायलसोबत तणाव, युद्धाचा परिणामही रियालच्या घसरणीला जबाबदार ठरला आहे. तसेच इराणी लोकांच्या मते, सरकारने अनेक महत्वपूर्ण योजना बंद करुन सर्व पैसा हा अण्वस्त्र कार्यक्रमांमध्ये गुंतवला आहे. ज्यामुळे रियालवर मोठा दबाव वाढत आहे.
इराणच्या चलन रियालची घसरण सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम करत आहे. यामुळे लोकांना अन्न-धान्य, औषधे आणि कपडे यांसारख्या दैनंदिन वस्तू देखील महाग मिळत आहे. तसेच वेतन दरमहा १०० डॉलर्सपर्यंत घसरले आहे. यामुळे देशातील नागरिकांमध्ये तीव्र संताप वाढत आहे. देशातील २० ते २५ टक्के जनता यामुळे दारिद्ररेषेखाली आहे.
Ans: आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे इराणच्या तेलाची निर्यात मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच सरकारी आर्थिक धोरणे आणि लोकांचा रियालवरील कमी होणारा विश्वास यामुळे इराणचे चलन घसरले आहे. तसेच इस्रायलसोबतचा तणाव, अमेरिकेसोबतचा तणावही याला कारणीभूत आहे.
Ans: इराणच्या चलन रियालची घसरण सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम करत आहे. यामुळे लोकांना अन्न-धान्य, औषधे आणि कपडे यांसारख्या दैनंदिन वस्तू देखील महाग मिळत आहे. तसेच वेतन दरमहा १०० डॉलर्सपर्यंत घसरले आहे.