Middle East War : अमेरिकेची हल्ल्याची जंगी तयारी! महाकाय घातक जहाज हिंद समुद्रात दाखल; इराणची धडधड वाढली (फोटो सौजन्य: ai जनरेटेड)
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने या घातक युद्धनौकेवर F-35, C-17 लढाऊ विमाने तैनात केकील आहे. यामुळे मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने देखील अमेरिकेच्या या पावालविरोधात तयारी सुरु केली आहे. अयातुल्ला अली खामेनी बंकरमध्ये लपले असून तेथून इराणच्या लष्कराला कारवाईचे आदेश दिले जात आहे. अमेरिकेला उत्तर देण्यासाठी इराणने देखील आपली शस्त्रे राष्ट्राभोवती तैनात करण्यास सुरुवात केली आहे.
इराणच्या घातक ड्रोनचे थवे अमेरिकेच्या यूएसएस अब्राहम लिंकर युद्धनौकेवरुन उडताना दिसले आहे. यामुळे इराण आणि अमेरिकेत युद्ध निश्चित असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. अमेरिका इराणच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, तर इराणही याला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहे.






