
Maynmar Foreign Miniser Visit Pakistan
शेजारी देशांमध्ये पाकिस्तान आणि चीनचा (China) वाढता प्रभाव पाहता भारतासाठी प्रादेशिक भू-राजकीय आव्हाने निर्माण होत आहे. या देशांमध्ये भारताचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. चीनने आधीच बांगलादेश आणि म्यानमारमध्ये आपला पाया भक्कम केला आहे. आता चीनच्या पावलावर पाय ठेवत पाकिस्तान देखील या देशांमध्ये आपली राजकीय उपस्थिती वाढवत आहे. चीनने म्यानमारच्या लष्करासोबत अधिकृत संबंध वाढवले आहेत. रेल्वे, रस्ते, उर्जा, प्रकल्प यांमुळे म्यानमार चीनच्या बेल्ट अँड रोडचा मुख्य भाग बनला आहे.
चीन आणि म्यानमारचे (Myanmar) संबंध आधीच वाढत असताना आता यामध्ये पाकिस्तानची एन्ट्री ही भारतासाठी गुंतागुंतीची होत आहे. भारतीय तज्ज्ञांच्या मते भारताला म्यानमधील चीनच्या प्रभावाखाली आपली भागीदारी वाढवणे कठीण जाणार आहे. चीनप्रमाणे भारतही म्यानमारच्या मोठ्या प्रकल्पांचा भाग आहे. भारताचा राखीन राज्यातील सिटवे बंदर कोलकाताशी जोडणार हा प्रकल्प रणनीतीक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु म्यानमारमध्ये चीनचा वाढता प्रभाव, अंतर्गत संघर्ष यामुळे भारताला आपले स्थान म्यानमारमध्ये टिकवून ठेवण्यात अनेक मोठी आव्हाने येत आहे.
अशा परिस्थिती पाकिस्तानने आणि म्यानमारची वाढती जवळीक ही भारतविरोधी एक समीकरण बनण्याची शक्यता आहे. यामुळे भारतासाठी अधिक गुंतागुंत निर्माण होणार आहेत. या दोन्ही देशांनी आधीच बांगलादेशमध्ये भारतविरोधी धोरणे आखली आहेत. यामुळे म्यानमारमधील त्यांच्या एन्ट्रीमुळे भारताचा प्रादेशिक प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतासाठी दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये शक्ती-संतुलन बनवून ठेवण्यासाठी अनेक आव्हानांचा समाना करावा लागणार आहे. या देशांमध्ये विश्वास, स्थैर्य आणि दीर्घकालीन धोरणांच्या आधारेच भारत हे साध्य करु शकतो.
भारतासाठी धोक्याची घंटा! सीमेजवळ पाकिस्तानच्या लष्करी हालचाली; युद्धाच्या तयारीत मुनीर?
Ans: म्यानमारमध्ये चीनचा प्रभाव आधीच आहे, अशा परिस्थिती पाकिस्तनची एन्ट्री अधिक गुंतागुंतीची होत आहे.यामुळे भारताविरोधी रणनीतीक दबाव वाढण्याची शक्यता आहे.
Ans: चीनने म्यानमारमध्ये लष्कराशी संबंध वाढवला आहे. तसेच रेल्वे, रस्ते, उर्जा यांसारख्या प्रकल्पांमध्ये सहभाग वाढवून प्रभाव वाढवला आहे.