Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dubai Royal Family: दुबईचे राजघराणे बनले सोन्याचा पिंजरा; का पळून जात आहेत राजकन्या आणि राण्या? सुनेच्या अटकेने खळबळ

Dubai Royal Family Controversy: बुर्ज खलिफा आणि आलिशान जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या दुबईच्या राजवाड्याबद्दल एक काळे सत्य आहे, जिथून राजकन्या आणि राण्यांच्या पलायनाच्या कथा अनेकदा जगाला धक्का देतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 06, 2026 | 10:44 AM
dubai royal family controversy princess latifa haya zeynab javadli arrest secrets

dubai royal family controversy princess latifa haya zeynab javadli arrest secrets

Follow Us
Follow Us:
  • सोन्याचा पिंजरा ठरतोय राजवाडा
  • राजकुमारी आणि पत्नींचे अपहरण
  • ताज्या वादात सुनेला तुरुंगवास

Dubai Royal Family Controversy Updates : दुबई (Dubai) म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते ती जगातील सर्वात उंच इमारत ‘बुर्ज खलिफा’, समुद्रात मानवाने निर्माण केलेले कृत्रिम बेट, आलिशान गाड्या आणि अब्जाधीशांची विलासी जीवनशैली. वाळवंटात सोन्याची नगरी वसवणारे दुबईचे शासक, शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांना जगात एक दूरदर्शी आणि यशस्वी नेता म्हणून पाहिले जाते. पण या झगमगत्या दुनियेच्या आणि भव्य राजवाड्याच्या पाठीमागे एक असे काळे आणि अस्वस्थ करणारे सत्य दडले आहे, ज्याने संपूर्ण जगाला विचार करायला भाग पाडले आहे. या राजवाड्याला आता ‘सोन्याचा पिंजरा’ म्हटले जात आहे, कारण इथल्या राजकन्या आणि राण्यांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे.

या वादाची मालिका जुनी असली, तरी नुकत्याच घडलेल्या एका ताज्या घटनेने दुबई प्रशासनाचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आणला आहे. २ जून रोजी दुबई पोलिसांनी राजघराण्याची सून आणि अझरबैजानची माजी राष्ट्रीय जिम्नॅस्ट झैनब जवादली (Zeynab Javadli) हिला तिच्या हॉटेलच्या खोलीतून अटक केली. या अटकेनंतर आंतरराष्ट्रीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असून, दुबईच्या राजवाड्यात स्त्रियांना नक्की कशी वागणूक दिली जाते, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PoKIsIndia: ‘हा भाग आमचा आहे’, गिलगिट-बाल्टिस्तानमधील पाकिस्तानच्या निवडणुक खेळीमुळे भारत संतप्त; परराष्ट्र मंत्रालयाचा कडक इशारा

राजकुमारी शम्सा: स्वातंत्र्याचा पहिला अपयशी प्रयत्न

दुबईच्या राजवाड्यात महिलांवर होणाऱ्या अन्यायाची पहिली मोठी ठिणगी २००० मध्ये पडली. शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांची मुलगी, राजकुमारी शम्सा (Princess Shamsa) हिने संपूर्ण कुटुंबासह ब्रिटनमध्ये सुट्टीवर असताना अचानक लंडनला पलायन केले. तिला राजवाड्यातील बंदिस्त आणि घुसमटीच्या वातावरणातून मुक्त होऊन एका सामान्य मुलीसारखे स्वतंत्र जीवन जगायचे होते. तिने ब्रिटनमध्ये काही दिवस घालवले देखील, परंतु तिचे हे स्वातंत्र्य फार काळ टिकू शकले नाही.

शम्सा लंडनमध्ये असतानाच दुबईच्या राजाने आपल्या गुप्तहेरांचे जाळे वापरून यूकेमधील केंब्रिज येथील एका रस्त्यावरून तिचे जबरदस्तीने अपहरण केले. तिला गुंगीचे औषध देऊन खाजगी विमानाने पुन्हा दुबईत आणले गेले. या घटनेला २४ वर्षे उलटून गेली आहेत, पण राजकुमारी शम्सा आज कुठे आहे, कशा परिस्थितीत आहे, याचे कोणतेही ठोस वृत्त जगासमोर आलेले नाही. या घटनेने पहिल्यांदाच दुबई राजघराण्याच्या अंतर्गत हुकूमशाहीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाश टाकला.

राजकुमारी लतीफा: समुद्राच्या लाटांमधील थरारक पलायन आणि भारताची भूमिका

राजकुमारी शम्साच्या धाडसाने प्रेरित होऊन तिची सख्खी बहीण, राजकुमारी लतीफा (Princess Latifa) हिने देखील राजवाड्यातून पळून जाण्याचा विडा उचलला. लतीफाने २००२ मध्ये पहिल्यांदा ओमानच्या मार्गाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ती सीमेवरच पकडली गेली. त्यानंतर तीन वर्षे तिला एका अंधाऱ्या खोलीत बंदिस्त ठेवण्यात आले आणि तिचा छळ करण्यात आला, असा आरोप तिने केला होता.

She is under arrest at the request of her ex-husband. She is an Azerbaijani former gymnast and he’s the nephew of Dubai ruler and also a shooter. His uncle had similar scandals too. “Dubai Public Prosecution told the BBC that Zenab Javadli was detained following a complaint… https://t.co/UMdjHrSmf0 pic.twitter.com/uOXibvadGb — Abdurahman Warsame (@abdu) June 4, 2026

credit – social media and Twitter

यानंतर २०१८ मध्ये तिने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दुसऱ्यांदा पलायन केले. यावेळी तिने सागरी मार्ग निवडला. एका लहान यॉटच्या (Yacht) साहाय्याने ती आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात पोहोचली आणि तिला भारतातून अमेरिकेत जाऊन राजकीय आश्रय घ्यायचा होता. मात्र, तिची ही बोट गोव्याजवळ भारतीय किनारपट्टीच्या जवळ पोहोचली असता, दुबईच्या सुरक्षा दलांनी भारतीय यंत्रणांच्या कथित मदतीने त्या बोटीवर हल्ला केला. लतीफाला मारहाण करून, गुंगीचे इंजेक्शन देऊन पुन्हा जबरदस्तीने दुबईला नेण्यात आले. नंतर तिने सोशल मीडियावर गुप्तपणे व्हिडिओ शेअर करून “मी इथे ओलीस आहे आणि माझा जीव धोक्यात आहे” असे सांगत आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची याचना केली होती.

प्रिन्सेस हया: २०१९ चे खरे वादळ आणि ऐतिहासिक घटस्फोट

या राजघराण्याला सर्वात मोठा धक्का बसला तो २०१९ मध्ये, जेव्हा दुबईच्या राजाची तिसरी पत्नी आणि जॉर्डनच्या राजघराण्याची कन्या, प्रिन्सेस हया बिंत अल हुसेन (Princess Haya bint Al Hussein) आपल्या दोन मुलांसह दुबईतून पळून जाण्यात यशस्वी झाली. तिने थेट ब्रिटन गाठले आणि तिथे राजकीय आश्रय मागितला. या घटनेने संपूर्ण आखाती देशांमध्ये खळबळ उडवून दिली.

ब्रिटनमध्ये पोहोचल्यानंतर हयाने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा खटला दाखल केला. तिने न्यायालयात धक्कादायक खुलासे करताना सांगितले की, तिच्या पतीच्या दोन्ही मुलींसोबत (शम्सा आणि लतीफा) काय घडले हे तिला समजले होते आणि तिच्या स्वतःच्या मुलांच्या जीवालाही तिथे धोका होता. हा खटला तब्बल दोन वर्षे चालला. या काळात दुबईच्या राजाने तिचा फोन हॅक केला, तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि सोशल मीडियावर तिच्याविरोधात धमक्या देणाऱ्या कविताही लिहिल्या. अखेर २०२१ मध्ये ब्रिटिश न्यायालयाने हयाच्या बाजूने निकाल दिला आणि तिला सुमारे ५५० दशलक्ष पाऊंडची (सुमारे ६ हजार कोटी रुपये) ऐतिहासिक पोटगी मंजूर केली, जी ब्रिटिश कायदेशीर इतिहासातील सर्वात मोठी रक्कम ठरली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: खाडीतील तणावाने गाठला धोक्याचा टप्पा; होर्मुझमध्ये दोन्ही सैन्यांमध्ये चकमक, अमेरिकेने उडवले इराणचे रडार केंद्र

ताज्या प्रकरणात सुनेला अटक: काय आहे झैनब जवादलीचे प्रकरण?

या सर्व घटना ताज्या असतानाच आता रशीद अल मक्तूम यांचे भाचे, शेख सईद बिन मक्तूम यांच्या कौटुंबिक वादाने उग्र रूप धारण केले आहे. शेख सईद यांनी २०१५ मध्ये अझरबैजानची प्रसिद्ध जिम्नॅस्ट झैनब जवादली हिच्याशी लग्न केले होते. मात्र, राजघराण्यातील जाचाला कंटाळून २०१९ मध्ये झैनबने घटस्फोट घेतला. तेव्हापासून ती तिच्या तीन लहान मुलींच्या ताब्यासाठी (Child Custody) कायदेशीर लढा लढत आहे.

घटस्फोटानंतर झैनबने दुबईतील एका हॉटेलच्या खोलीलाच आपले घर बनवले होते. गेल्या ६ वर्षांपासून ती आणि तिच्या मुली एकाच खोलीत बंदिस्त जीवन जगत होत्या, कारण बाहेर पडल्यास तिच्या मुलींना हिरावून घेतले जाईल अशी तिला भीती होती. २०२५ मध्ये तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून तिच्या आणि मुलांच्या सुरक्षेबद्दल अत्यंत गंभीर चिंता व्यक्त केली होती. अखेर २ जून रोजी दुबई पोलिसांनी तिला तिच्या हॉटेलच्या खोलीतून अटक केली. पोलिसांनी या अटकेचे समर्थन करताना म्हटले आहे की, तिचे माजी पती शेख सईद यांनी तक्रार केली होती की झैनब मुलांचे मानसिक आरोग्य खराब करत आहे. मात्र, मानवाधिकार संघटनांनी या कारवाईला बेकायदेशीर ठरवत तीव्र निषेध नोंदवला आहे. झैनब आणि तिच्या मुली सध्या कुठे आहेत, याबाबत दुबई सरकारने गुप्तता पाळली आहे.

शाही थाटमाट आणि महिलांच्या स्वातंत्र्याचा बळी

दुबई राजघराण्यातील महिलांना नक्की राजवाडा का सोडावासा वाटतो? या प्रश्नाचे उत्तर आखाती देशांच्या जुनाट पुरुषप्रधान मानसिकतेत दडलेले आहे. जगासमोर या राजघराण्याला नेहमी एखाद्या परीकथेप्रमाणे परिपूर्ण आणि आदर्श दिसावे लागते. हे साध्य करण्यासाठी तिथल्या महिलांना काय घालायचे, कुठे जायचे, कोणाशी बोलायचे यावर अत्यंत कडक निर्बंध असतात. त्यांचे फोन टॅप केले जातात आणि त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा पूर्णपणे बळी दिला जातो.

दुसरीकडे, राजघराण्यातील पुरुषांना मात्र अफाट स्वातंत्र्य आहे. ते महागड्या यॉटमध्ये परदेशी मॉडेल्ससोबत पार्ट्या करताना आणि सोशल मीडियावर विलासी जीवनशैलीचे प्रदर्शन करताना दिसतात. हा दुटप्पीपणा आणि ‘सोन्याच्या पिंजऱ्यातील’ घुसमट सहन न झाल्यामुळेच इथल्या सुशिक्षित आणि आधुनिक विचारांच्या स्त्रिया राजवाडा सोडून पळून जाण्याचा जीवघेणा मार्ग निवडत आहेत.

Web Title: Dubai royal family controversy princess latifa haya zeynab javadli arrest secrets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • controversy
  • Dubai
  • World news

संबंधित बातम्या

PoKIsIndia: ‘हा भाग आमचा आहे’, गिलगिट-बाल्टिस्तानमधील पाकिस्तानच्या निवडणुक खेळीमुळे भारत संतप्त; परराष्ट्र मंत्रालयाचा कडक इशारा
1

PoKIsIndia: ‘हा भाग आमचा आहे’, गिलगिट-बाल्टिस्तानमधील पाकिस्तानच्या निवडणुक खेळीमुळे भारत संतप्त; परराष्ट्र मंत्रालयाचा कडक इशारा

War Alert: खाडीतील तणावाने गाठला धोक्याचा टप्पा; होर्मुझमध्ये दोन्ही सैन्यांमध्ये चकमक, अमेरिकेने उडवले इराणचे रडार केंद्र
2

War Alert: खाडीतील तणावाने गाठला धोक्याचा टप्पा; होर्मुझमध्ये दोन्ही सैन्यांमध्ये चकमक, अमेरिकेने उडवले इराणचे रडार केंद्र

Trump-Putin यांच्या तोंडात पंतप्रधान मोदींचच नाव; भारतासोबत मैत्रीमागे अमेरिका-रशियाचं नेमकं प्लॅन काय?
3

Trump-Putin यांच्या तोंडात पंतप्रधान मोदींचच नाव; भारतासोबत मैत्रीमागे अमेरिका-रशियाचं नेमकं प्लॅन काय?

Trump on Hormuz : ‘आम्हाला कुणाची गरज नाही’ , Hormuz वरुन ट्रम्प यांचा कडक इशारा; युरोपीय देशांना भोगावे लागणार परिणाम?
4

Trump on Hormuz : ‘आम्हाला कुणाची गरज नाही’ , Hormuz वरुन ट्रम्प यांचा कडक इशारा; युरोपीय देशांना भोगावे लागणार परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.