इराण-इस्रायल युद्धादरम्यान अमेरिकेने सुरू केली युद्धाची तयारी
जेरुसलेम : इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध अजूनही सुरूच आहे. मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे सांगितले जाते. इथे अमेरिकाही आपली तयारी करत असल्याचे दिसते. यूएस एअर फोर्सचे एफ-22 रॅप्टर विमान यूएस सेंट्रल कमांडच्या जबाबदारीच्या क्षेत्रात पोहोचले आहे. इराण किंवा त्याच्या मित्र राष्ट्रांकडून प्रादेशिक स्तरावर जो तणाव निर्माण झाला आहे. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी या भागातील अमेरिकेच्या लष्करी पवित्र्यात बदल करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून अमेरिकेची ही योजना असल्याचे मानले जात आहे. अमेरिका मध्यपूर्वेत लढाऊ विमाने आणि इतर उपकरणेही तैनात करत आहे. कारण इराण आणि हिजबुल्लाहकडून इस्रायलवर होणाऱ्या संभाव्य हल्ल्यामुळे तणाव खूप जास्त आहे. अमेरिकेनेही या युद्धाची तयारी पूर्ण केली असल्याचा दावा केला जात आहे.
हल्ला लवकरच होऊ शकतो
इराण आणि हिजबुल्लाह काही दिवसांतच इस्रायलवर हल्ला करू शकतात. असा दावा अमेरिकन न्यूज वेबसाइटने केला आहे. इराण आणि हिजबुल्लाहने इस्रायलकडून बदला घेण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे हमास आणि हिजबुल्लाच्या सर्वोच्च नेत्यांच्या मृत्यूनंतर मध्यपूर्वेत तणाव आणखी वाढला आहे. मात्र हा हल्ला केव्हा होणार याची तारीख अद्याप ठरलेली नसून, इराण आणि हिजबुल्ला हे दोघेही प्रत्युत्तर देतील असा दावा केला जात आहे.
U.S. Air Force F-22 Raptors arrived in the U.S. Central Command area of responsibility Aug. 8 as part of U.S. force posture changes in the region to mitigate the possibility of regional escalation by Iran or its proxies. pic.twitter.com/BuuzbUHu9s
— U.S. Central Command (@CENTCOM) August 8, 2024
लष्कराची उपस्थिती वाढली
जेव्हापासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. तेव्हापासून मध्यपूर्वेत लष्करी उपस्थिती वाढवण्यात आली आहे. अमेरिकेने आपले सैन्य देखील तयार केले आहे. ज्यात लढाऊ विमानांचाही समावेश आहे. अमेरिकेचा मित्र देश जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री रविवारी(दि. ४ ऑगस्ट) इराणला पोहोचले.
अमेरिकेने सैन्य तैनात केले
इस्रायलवरील कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यासाठी अमेरिकेने मध्यपूर्वेत 12 युद्धनौका तैनात केल्या आहेत. याशिवाय युद्धनौका, अनेक लढाऊ विमाने आणि हवाई संरक्षण यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी गेल्या गुरुवारी बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर बोलून इस्रायलच्या संरक्षणासाठी मदतीचे आश्वासन दिले.