Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ebola Outbreak : काँगोत इबोलाचा हाहा:कार! १,५०० हून अधिक बाधित, शेकडोंचा मृत्यू, आणीबाणीची स्थिती

Ebola Outbreak Update : आफ्रिकेच्या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोत (DRC) इबोलाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 05, 2026 | 06:20 PM
Ebola Outbreak

Ebola Outbreak

Follow Us
Follow Us:
  • काँगोत इबोलाचा हाहा:कार
  • १,५०० हून अधिक बाधित, शेकडोंचा मृत्यू
  • परिस्थिती अत्यंत चिंतानजनक
Ebola Outbreak News in Marathi : ऑफ्रिकेच्या डेमोक्रिटक रिपल्बिक ऑफ कॉंगोत इबोला विषाणूचा धोका मोठ्या प्रमाणात वाझला आहे. देशात आतापर्यंत इबोलाचे १,५२८ रुग्ण आढळले असून ४९२ लोकांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या संसर्गामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून आरोग्य यंत्रणेसमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहे. आरोग्य आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Ebola Outbreak : फ्रान्समध्ये इबोलाचा शिरकाव!कॉंगोहून परतलेल्या डॉक्टरमध्ये आढळला संसर्ग; WHO कडून अलर्ट जारी

मीडिया रिपोर्टनुसार, सध्या ६२८ रुग्णांवर रुग्णालयता आणि विलगीकरण केंद्रांमध्ये उपचार सुरु असून २३९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही आठवड्यांत ३०० हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच १८५ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

तपासणीतील अडथळे

सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्यात अनेक अडचणी येत आहेत. काही भागांतील नागरिक तपासणीसाठी नमुने देण्यास विरोध करत आहेत. पूर्वेकडील नॉर्थ किवू प्रांतातही उपचार केंद्रात मोठा ताण आला आहे. संपर्कात आलेला लोकांचा शोध घेणे, तपासणी अहवाल उशिरा मिळणे आणि वैद्यकीय उपकरणांची कमतरता यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक भागांमध्ये असुरक्षित वातावरण आहे. दुसरीकडे सशस्त्र बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामात अनेक अडथळे निर्माण होत आहेत.

युगांडामध्ये भीतीचे वातावरण

सध्या या धोकादायक विषाणूचा प्रार्दूभाव शेजारी देश युगांडामध्येही पोहोचला आहे. युगांडामध्ये २० रुग्णांची नोंद झाली आहे. सुदैवाने स्थानिक पातळीवर सध्या कोणताही धोका नाही. परंतु भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंगो आणि युगांडाने एक संयुक्त आराखडा तयार केला असून सीमावर्ती भागांमध्ये तपसाणी आणि उपचार व्यवस्था मजबूत केली जात आहे.

आणीबाणीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता

सध्या इबोलावर कोणताही ठोस उपचार किंवा लस उपलब्ध नाही. यामुळे जागतिक आरोग्य संघटना (WHO) यावर संशोधन कपत आहे. परंतु विषाणूचा प्रागदुर्भाव वाढतच राहिला तर आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण होऊ शकते. खाण क्षेत्रांमध्ये होणाऱ्या लोकांची ये-जा संसर्ग वाढण्याचे कारण असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Ebola Outbreak : आफ्रिकेत इबोला विषाणूचा झपाट्याने प्रसार; मृतांचा आकडा १०० पार, WHO कडून गंभीर इशारा

Web Title: Ebola outbreak congo 1500 cases hundreds dead emergency situation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Ebola
  • WHO
  • World news

संबंधित बातम्या

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस
1

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक
2

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन
3

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी
4

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.