Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Earthquake: इजिप्त आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; सुएझ शहरात 5.4 तीव्रतेचा थरार, प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी

आज पहाटे इजिप्तमध्ये ५.४ तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू सुएझ शहराच्या जवळ होता. आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, मात्र कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 03, 2026 | 02:30 PM
पेरूमध्ये ६.७ तीव्रतेचा भूकंप

पेरूमध्ये ६.७ तीव्रतेचा भूकंप

Follow Us
Follow Us:
  • इजिप्तमध्ये ५.४ तीव्रतेचा जोरदार धक्का
  • म्यानमारमध्येही ३.३ तीव्रतेचा सौम्य भूकंप
  • कोणतीही जीवित किंवा वित्तहानी नाही

आज ३ ऑगस्ट २०२६ च्या पहाटे आंतरराष्ट्रीय स्तरावर भूकंपाचे ( Earthquake) दोन मोठे धक्के नोंदवले गेले आहेत. ईशान्य आफ्रिकन देश इजिप्तमध्ये ५.४ तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांची झोप उडवली, तर दुसरीकडे आशियाई राष्ट्र म्यानमारमध्येही ३.३ तीव्रतेचे सौम्य धक्के जाणवले. या दोन्ही घटनांमुळे संबंधित भागातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असले, तरी सुदैवाने आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) ने दिलेल्या माहितीनुसार, इजिप्तमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.४ इतकी नोंदवली गेली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता. सुरुवातीला आंतरराष्ट्रीय देखरेख संस्था EMSC ने हा भूकंप सुएझ शहराच्या वायव्येस सुमारे २९ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले होते. मात्र, इजिप्शियन प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण देत या भूकंपाचा केंद्रबिंदू सुएझ शहरापासून सुमारे ३८ किलोमीटर अंतरावर असल्याचे निश्चित केले आहे.

आपत्कालीन प्रतिसाद योजना कार्यान्वित

भूकंपाच्या धक्क्यानंतर इजिप्तच्या रेड क्रेसेंटने (Egyptian Red Crescent) तातडीने ज्या जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये हादरे जाणवले, तेथे आपली आपत्कालीन प्रतिसाद योजना कार्यान्वित केली आहे. रेड क्रेसेंट आणि स्थानिक प्रशासनाकडून बाधित परिसराची बारकाईने पाहणी केली जात आहे. नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून जुन्या किंवा तडे गेलेल्या इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असा इशारा रेड क्रेसेंटने दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Crimes: रशियाचा झापोरिझियावर विनाशकारी ग्लाइड बॉम्ब हल्ला; बहुमजली इमारत उद्ध्वस्त, 1 महिला ठार, 31 नागरिक गंभीर जखमी

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन इजिप्तचे आरोग्य मंत्री खालेद अब्देल गफ्फार यांनी देशभरात आपत्कालीन प्रतिसाद योजना (Emergency Response Plan) लागू करण्याचे स्पष्ट आदेश जारी केले आहेत. देशातील सर्व रुग्णवाहिका सेवांना आणि वैद्यकीय पथकांना ‘उच्च सज्जतेवर’ (High Preparedness) राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इजिप्त आणि पूर्व भूमध्य सागरी प्रदेश हे तांत्रिकदृष्ट्या भूकंपप्रवण क्षेत्रात येतात, त्यामुळे या भागात अधूनमधून या तीव्रतेचे भूकंप होत असतात, परंतु सामान्यतः यामुळे मोठे नुकसान होत नाही.

EQ of M: 3.3, On: 03/08/2026 04:35:59 IST, Lat: 25.250 N, Long: 94.806 E, Depth: 105 Km, Location: Myanmar.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @DrNKalaiselvi @GSuresh_NCS @ndmaindia pic.twitter.com/tDbWQ3Juf5
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) August 2, 2026

credit – social media and Twitter

म्यानमारमध्येही भूकंपाचे धक्के

दुसरीकडे, आशियाई देश म्यानमारमध्येही ३ ऑगस्ट रोजी पहाटे ३.३ तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला. हा भूकंप जमिनीखाली १०५ किलोमीटर खोलीवर झाला. केंद्रबिंदू खूप खोल असल्याने आणि तीव्रता कमी असल्याने स्थानिक रहिवाशांना फारसे मोठे हादरे जाणवले नाहीत. म्यानमार प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे देशात कुठेही हानी झाल्याची नोंद झालेली नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ceuta Crisis: स्पेनने सेउटा सीमेवर उभारली ‘तरंगती सागरी भिंत’; अवैध घुसखोरी रोखताना 72 स्थलांतरितांचा मृत्यू, युरोपमध्ये खळबळ

इजिप्तचा सर्वात भीषण ऐतिहासिक भूकंप

ईशान्य आफ्रिकन देशांमध्ये अशा प्रकारे तीव्र भूकंप येण्याच्या घटना दुर्मिळ मानल्या जातात. इजिप्तच्या आधुनिक इतिहासातील सर्वात घातक आणि भयानक भूकंप ऑक्टोबर १९९२ मध्ये झाला होता. त्या वेळी ५.८ तीव्रतेच्या भूकंपाने राजधानी कैरोसह संपूर्ण देश हादरला होता, ज्यामध्ये ५०० हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि हजारो लोक बेघर झाले होते. त्यामुळेच आज पहाटे ५.४ तीव्रतेचा धक्का बसताच नागरिकांमध्ये ९२ च्या दुर्घटनेच्या आठवणी ताज्या होऊन भीतीचे सावट पसरले होते. सध्या दोन्ही देशांतील सरकारी यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Egypt myanmar earthquake suez magnitude 5 4 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Earthquake
  • Egypt
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.