Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इजिप्तचा गाझामध्ये इस्त्रायल-हमास युद्धबंदीचा प्रस्ताव; चार ओलिसांची होणार सुटका?

गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझामध्ये विध्वंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल-फताह अल-सिसी यांनी दोन दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव मांडला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 28, 2024 | 02:22 PM
इजिप्तचा गाझामध्ये इस्त्रायल-हमास युद्धबंदीचा प्रस्ताव; चार ओलिसांची होणार सुटका

इजिप्तचा गाझामध्ये इस्त्रायल-हमास युद्धबंदीचा प्रस्ताव; चार ओलिसांची होणार सुटका

Follow Us
Close
Follow Us:

कैरो: गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझामध्ये विध्वंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायली सैन्याच्या सततच्या हवाई हल्ल्यांमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला असून अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या स्थितीमध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल-फताह अल-सिसी यांनी दोन दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार, गाझामध्ये ठेवलेल्या चार ओलीसांची सुटका केली जाईल, तसेच काही पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका आणि गाझा पट्टीला मानवतावादी मदत पुरवली जाईल.

दोन दिवसांची युद्धविरामाची मागणी

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल-फताह अल-सिसी यांनी कैरोमध्ये बोलताना सांगितले की, त्यांच्या प्रस्तावाचा काही पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका तसेच गाझा पट्टीला मानवतावादी मदत पुरवण्याचा उद्देश आहे. दोन दिवसांच्या युद्धबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली की, ती कायमस्वरूपी करण्यासाठी चर्चा सुरू राहील. या प्रस्तावानुसार युद्धविराम झाला तर तो गाझामधील लोकांसाठी एक मोठा दिलासा ठरेल. या प्रस्तावात इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांनी अशा प्रकारची योजना जाहीरपणे मांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हे देखील वाचा- मिशेल ओबामा यांचा कमला हॅरिसला पाठिंबा; तर ट्रम्प यांनी मागितले मुस्लिम आणि अरब मतदारांचे समर्थन

इस्रायल किंवा हमासकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही

मात्र, याबाबत इस्रायल किंवा हमासकडून लगेच कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इजिप्त, कतार आणि अमेरिका हे हमास आणि इस्रायल यांच्यात प्रमुख मध्यस्थ म्हणून कार्यरत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या लढाईनंतर आठवडाभर चाललेल्या युद्धविरामानंतर अद्याप कोणताही ठोस युद्धविराम झालेला नाही. दरम्यान, इस्रायलचे मोसाद प्रमुख कतारचे पंतप्रधान आणि सीआयए प्रमुख यांच्याशी चर्चेसाठी रविवारी दोहाला जात आहेत.

इस्त्रायचे गाझावर हल्ले सुरूच आहेत

गाझामध्ये शनिवारी, 27 ऑक्टोबर रोजी इस्रायलने हल्ले सुरूच ठेवले. उत्तर गाझामधील 6 इमारतींना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यात 45 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे अनेक लोक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की हमासचा नाश होईपर्यंत हे युद्ध सुरूच राहणार आहे.

7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने हल्ला केल्यापासून इस्रायली लष्कराने गाझावर सतत हल्ले केले आहेत. या युद्धात आतापर्यंत 42 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाखाहून अधिक लोक जखमी झाले आहेत. गाझातील सुमारे 75 टक्के पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इजिप्तचा प्रस्ताव गाझामधील लोकांसाठी एक आशेचा किरण ठरू शकतो.

हे देखील वाचा- इस्रायलवर दहशतवादी हल्ला: मोसाद मुख्यालयाजवळ ट्रकने अनेकांना चिरडले; घटनेचा तपास सुरू

Web Title: Egypt proposes a 2 day gaza cease fire and release of 4 hostages nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 02:22 PM

Topics:  

  • Egypt
  • Gaza
  • Hamas
  • Israel

संबंधित बातम्या

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी
1

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा
2

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा

ट्रम्प यांनी तयार केला गाझाचा नवीन नकाशा? सीमेवर इस्रायल बफर-झोनसह होणार ‘हे’ बदल, समजून घ्या
3

ट्रम्प यांनी तयार केला गाझाचा नवीन नकाशा? सीमेवर इस्रायल बफर-झोनसह होणार ‘हे’ बदल, समजून घ्या

गाझातील कारवाया इस्रायलला पडल्या महागात; ‘या’ देशाने शस्त्रास्त्र करार रद्द केल्याने झाले अब्जावधींचे नुकसान
4

गाझातील कारवाया इस्रायलला पडल्या महागात; ‘या’ देशाने शस्त्रास्त्र करार रद्द केल्याने झाले अब्जावधींचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.