
Gaza Board Of Peace
ट्रम्पचा Gaza Peace Plan अपयशी? फ्रान्सने बोर्ड ऑफ पीस मध्ये सामील होण्यास दिला नकार, म्हणाले…
ट्रम्प यांनी गाझातील पुनर्बांधणी प्रक्रियेवर देखरेखीसाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गाझा (Gaza) बोर्ड ऑफ पीस असे या समितीचे नाव असून ट्रम्प स्वत: याचे अध्यक्ष असणार आहेत. ट्रम्प यांनी या समितीत सहभागी होण्यासाठी जगभरातील विविध देशांना आमंत्रण पाठवले आहे. रशिया (Russia) आणि भारतालाही याचे निमंत्रण मिळाले आहे. दरम्यान ट्रम्प यांच्या या समितीमध्ये सहभागी होण्यासाठी आठ मुस्लिम देशांनी मान्यता दिली आहे.
ट्रम्प यांच्या गाझा बोर्ड ऑफ पीसमध्ये आठ मुस्लिम देशांचा सहभाग असणार आहे. यामध्ये सौदी अरेबिया तुर्की , इजिप्त, जॉर्डन, इंडोनेशिया, पाकिस्तान , कतार आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा समावेश असणार आहे. या देशांनी ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीस समितीमध्ये प्रतिनिधी पाठवण्यास सहमती दर्शवली आहे. संयुक्त राष्ट्रा परिषदेच्या आदेशानुसार, हे मंडळ तयार करण्यात आले आहे.
बोर्ड ऑफ पीस हे ट्रम्प यांनी स्थापन केलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था गाझातील प्रशासन स्थापन करण्यासाठी, तेथील पुनर्बांधणीवर देखरेख ठेवण्यासाठी, युद्धानंतरच्या परिस्थितीवर देखरेखीसाठी, तसेच भविष्यातील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. गाझात सुरक्षित आणि मानवतावादी वातावरण निर्माण करणे याचा हेतू आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे लक्ष या समितीला केवळ गाझापुरते मर्यादित ठेवणे नाही, तर भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय वाद, युद्धजन्य परिस्थिती सोडवण्यासाठी एक जागतिक केंद्र बनण्याचा आहे. यामुळे यामध्ये प्रभावशाली देशांचा सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान ट्रम्प यांनी या परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियालाही आमंत्रण दिले आहे. परंतु अद्याप रशियाने बोर्ड ऑफ पीस मधील सहभागावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या पुतिन ट्रम्पचे आमंत्रण स्वीकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतालाही समितीमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले आहे. तर फ्रान्सने यामध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.