Gaza Peace Plan : युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प पुन्हा मैदानात? बोर्ड ऑफ पीस स्थापन करण्याची केली घोषणा, पुतिनसह भारताला निमंत्रण
Israel Hamas War : ‘… वेळ संपत चाललीय’ ; नेतन्याहूंशी बैठकीनंतर ट्रम्प यांचा हमासला कडक इशारा
अमेरिकेच्या व्हाइट हाउसने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प गाझातील युद्धग्रस्त प्रदेशाचे व्यवस्थापन करण्यासाठी या समितीची स्थापन करत आहेत. यासाठी पॅलेस्टिनींचे एक स्वतंत्र प्रशासन स्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान या आंतर्गत ट्रम्प गाझामध्ये सैन्य तैनात करणार आहे. यासाठी त्यांनी पाकिस्तान आणि तुर्कीला आमंत्रण दिले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तान हा दहशतवाद आणि दहशतवाद्यांना आश्रय देणार देश म्हणून मानला जातो. तर तुर्की हा पाकिस्तानचा मित्र देश आहे. अशा परिस्थिती या देशांचा समितीमध्ये प्रवेश अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.
दरम्यान ट्रम्प यांनी त्यांच्या या मंडळात भारताच्या सहभागाचीही इच्छा व्यक्त केली आहे. भारत हा इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांनाही स्वीकारार्ह देश आहे. दोन्ही देशांशी भारताचे चांगले संबंध आहेत. यामुळे भारताची बोर्ड ऑफ पीसमध्ये उपस्थिती ही मध्यपूर्वेत शांततेला हातभार लावू शकते. सध्या भारताने यावर कोणतेही अधिकृत विधाने केलेले नाही. यापूर्वी भारताने केवळ ट्रम्पच्या गाझा शांतता योजनेला पाठिंबा दर्शवला आहे.
याशिवाय ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनाही या शांतता समितीमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रिक केले आहे. रशियाच्या क्रेमलिनने याची पुष्टी केली आहे. परंतु अद्याप याबाबत स्पष्ट तपशीलवार देण्यात आलेला नाही.
गाझामध्ये गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ इस्रायल आणि हमास युद्ध (Isreal Hamas War) सुरु होते. आता या दोन्ही गटांत अमेरिका, कतार च्या मध्यस्थीने युद्ध बंदी लागू करण्यात आली आहे. या युद्धबंदीतील पहिला टप्पा पूर्ण झाला असून ट्रम्प आता दुसऱ्या टप्प्याकडे वळत आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही बाजूंनी आपल्याल कैद्यात असलेल्या लोकांना सोडले आहे. तसेच इस्रायलने आपले सैन्यही माघार घेतले आहे. परंतु अजूनही तणाव पूर्णपणे् निवळलेला नाही.
कारण दुसऱ्या टप्प्यात अमेरिका गाझात पुनर्बांधणीसाठी सैन्य तैनात करणार असून हमासला शस्त्रे सोडायची आहे. परंतु हमासने शस्त्रे सोडण्यास नकार दिला आहे. शिवाय गाझात प्रशासन स्थापन करताना त्यामध्ये हमासचा सहभाग नसणार आहे. या प्रशासनाच्या स्थापनेसाठी आणि गाझाच्या पुनर्बांधणीसाठी ट्रम्प पीस ऑफ बोर्ड समिती स्थापन करत आहेत. जेणेकरुन सर्व घटकांवर देखरेख ठेवता येईल.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझातील इस्रायल-हमास युद्ध पूर्णपणे संपवण्यासाठी बोर्ड ऑफ पीस स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
Ans: बोर्ड ऑफ पीस हे ट्रम्प यांनी स्थापन केलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था गाझातील प्रशासन स्थापन करण्यासाठी, तेथील पुनर्बांधणीवर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.
Ans: ट्रम्प यांनी या समितीत सहभागी होण्यासाठी रशिया, भारत, पाकिस्तान, तुर्की यांसह इतर काही देशांना आमंत्रण दिले आहे.
Ans: बोर्ड ऑफ पीसचे अध्यक्षपद स्वत: ट्रम्प भूषवणार आहेत.






