Elon Musk's fight with Trump US suspends testing of SpaceX's hypersonic rockets
Donald Trump VS Elon Musk : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांच्या पुन्हा एकदा तीव्र वाद सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बिग वन ब्युटीफूल या धोरणावरुन पुन्हा दोघांमध्ये राजकीय वाद सुरु झाला आहे. दोघांची मैत्री शत्रुत्वात बदलली आहे. ट्रम्प यांचे विधेयक मंजूर झाले आहे. यामुळे मस्क यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तर याला प्रत्युत्तर म्हणून ट्रम्प यांनी देखील एलॉन मस्क यांना मोठा धक्का दिला आहे.
एलॉन मस्क यांच्या कंपन्यांचे अमेरिकन सरकारशी अनेक करार आहेत. यातील स्पेसएक्स कंपनीशी असलेला एक करार स्थगित करण्यात आला आहे. एलॉन मस्क यांच्या स्पेएसएक्सच्या मदतीने अमेरिकेचे हवाई दल हायपरसॉनिक कार्गो रॉकेट्सची चाचणी करणा होते, परंतु सध्या ही चाचणी स्थगित करण्यात आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानमध्ये पाळतू सिंहाची दहशत ; वस्तीत घुसून लोकांवर हल्ला केला अन्…; VIDEO VIRAL
अमेरिकन लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, स्पेसएक्ससोबतची हायपरसॉनिक रॉकेट्सटी चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही चाचणी पॅसिफिक महासारगातील एका लहान बेटावर होणार होती. अमेकिन लष्कर आणि स्पेसएक्सच्या या प्रकल्पांतर्गत ९० मिनिटांत पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहचेल असेल रॉकेट्सच्या निर्मिती होणार होती. परंतु मस्क आणि ट्रम्प यांच्यातील सुरु असलेल्या वादामुळे ही चाचणी पुढे ढकलण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, स्पेसएक्सच्या हायपरसॉनिक रॉकेट कार्गो डिलिव्हरी चाचणीला विलंब झाला आहे. सध्या या प्रकल्पाचे पर्यावरणीय मुल्यांकन सुरु करण्यात आले आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने चाचणी पुढे ढकलण्यामागे याचा समुद्री जीवांवर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. परंतु काही तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांनी एलॉन मस्कविरोधात सुरु असलेल्या वादामुळे हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. सध्या एलॉन मस्क यांच्या कंपनींचे अनेक सरकारी करार धोक्यात आले आहेत.
ट्रम्प सत्तेत आल्यानतंर एलॉन मस्क यांच्या, टेस्ला, स्पेसएक्स, एक्स यांसारख्या कंपन्यांना सराकरकडून अनेक २५ हजार कोटींचे करार मिळाले होतेय परंतु हे सरकारी करार रद्द झाल्यास मस्क यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अलीकडेच ट्रम्प यांनी स्पेसएक्स सोबतचे सरकारी करार संपवण्याचे किंवा बजेट कमी करण्याची धमकी दिली होती. यामुळे स्पेसएक्ससोबतची चाचणी स्थगित केल्यामागे ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद मुळ कारण असल्याचे म्हटले जात आहे. आता यावर एलॉन मस्क नेमका काय निर्णय घेतात हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.