Erdogan calls Benjamin Netnyahu Hitler amid Israel-Iran War
अंकारा : मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायलमध्ये तीव्र युद्ध भडकले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर कारवाई सुरु केली आहे. याच वेळी इतर राष्ट्रांकडून देखील यावर प्रतिक्रिया येत आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगानने देखील इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंविरोधाक विष ओकले आहे. त्यांनी नेतन्याहूंची तुलना हिटलरशी केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एर्दोगान यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा इराण आणि इसल्रायलमधील युद्ध आगीमध्ये धगधगत आहे.
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी नेतन्याहूंची तुलना हिटलरशी केली आहे. तसेच त्यांना ढोंगी म्हणूनही संबोधले आहे. त्यांनी म्हटले आहे की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ॲडॉल्फ हिटरल यांच्यासारखे आहेत. दोघांनाही केवळ विनाश हवा आहे. त्यांनी नेतन्याहूंवर हल्ला चढवत त्यांना ढोंगी म्हणून देखील संबोधले आहे. त्यांनी म्हटले आहे की, इस्रायल कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करत नाही, तसेच स्वत:चा अणुकार्यक्रमर समृद्ध करत आहे.
‘2 million in Gaza live in worse conditions than Nazi concentration camps’
Erdogan blasts Israel’s ‘policies of destruction, occupation, violence’
‘Every passing day, they murder 100s of innocent civilians’ https://t.co/nqo3DIlMiE pic.twitter.com/gSm8fTYsi5
— RT (@RT_com) June 21, 2025
एर्दोनागन यांनी पुढे म्हटले की, इराणला त्यांच्या लोकांचे रक्षण करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. तसेच इस्रायलच्या कारवाईमुळे गाझातील जवळपास २० लाख लोकांना नाझी छावण्यांमध्ये राहावे लागत आहे, गाझातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. इस्रायल सध्या विनाशाच्या मार्गावर आहे.
गाझामध्ये त्याने विनाश, कब्जा आणि हिंसाचार धोरण राबवले आणि आणि इराणमध्येही तो हेच करत असल्याचे एर्दोगानने म्हटले आहे. इस्रायलच्या या कारावईममुळे दररोज शेकडो निरापराध लोक मारले जात असल्याचे म्हटले आहे. नेतन्याहूंना मध्य पूर्वेत प्रादेशिक अस्थिरता निर्माण करत असल्याचे म्हटले आहे. नेतन्याहूंमुळे मध्यपूर्वेत विनाश प्रारंभ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इस्रायल इराणला आण्विक शस्त्रे बनवण्यापासून रोखत आहे, परंतु दुसरीकडे स्वत:च आपला अणु कार्यक्रम समृद्ध करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी इराणवरील इस्रायलच्या आरोपांचा आणि हल्ल्यांचाही तीव्र निषेध केला आहे.
सध्या इस्रायलच्या अमेरिकाचा मोठा पाठिंबा मिळत आहे, तर इराणला रशिया आणि चीनचा पाठिंबा मिळत आहे. परंतु या देशांनी युद्धात थेट उडी मारली नाही, तर अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहेत.